Google Dainik Gomantak
ग्लोबल

Google डेटा सेंटरमध्ये शॉर्ट सर्किट, 3 कर्मचारी गंभीर जखमी

Google Data Center: डेटा सेंटर इमारतींच्या जवळ असलेल्या सबस्टेशनवर तीन इलेक्ट्रिशियन काम करत असताना विद्युत स्फोट झाला.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेतील कौन्सिल ब्लफ्स येथे असलेल्या गुगलच्या डेटा सेंटरमध्ये शॉर्ट सर्किट होउन स्फोट झाला आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, या अपघातात 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

कौन्सिल ब्लफ्स पोलिस विभागाने रॉयटर्सला सांगितले की ही घटना सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:59 वाजता घडली. डेटा सेंटर इमारतींच्या जवळ असलेल्या सबस्टेशनवर तीन इलेक्ट्रिशियन काम करत असताना आर्क फ्लॅश (विद्युत स्फोट) झाला, ज्यामुळे तिन्ही इलेक्ट्रिशियन गंभीर जळाले आहे.

अहवालानुसार, एका व्यक्तीला हेलिकॉप्टरने नेब्रास्का मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. इतर दोघांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले. आयोवा-नेब्रास्का सीमेवर बसलेल्या कौन्सिल ब्लफ्सपासून नेब्रास्का मेडिकल सेंटर थोड्या अंतरावर आहे. कौन्सिल ब्लफ्स पोलिस विभागाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांना वैद्यकीय आणीबाणीसाठी नेण्यात आले. तेव्हा तिघेही लोक शुद्धीत होते आणि श्वास घेत होते. सध्या त्यांच्या ताज्या अपडेटची प्रतीक्षा आहे.

Google ची डेटा केंद्रे कुठे आहेत?
गुगल डेटा सेंटरच्या रूपात प्रचंड ड्राईव्ह, कॉम्प्युटरचे शेल्फ, अंतर्गत आणि बाह्य नेटवर्क सुविधा, कूलिंग सिस्टीम आणि विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरचा एक मोठा गुप्त परिसर दिसतो. ही डेटा सेंटर्स गुगलने जगभरात अनेक ठिकाणी तयार केली आहेत. उत्तर अमेरिकेत, बर्कले काउंटी, कौन्सिल ब्लफ्स, डग्लस काउंटी, जॅक्सन काउंटी, लेनोइर, माँटगोमेरी काउंटी, मेस काउंटी, द डॅलस, हेंडरसन आणि रेनो येथे Google केंद्र आहे.

याशिवाय उरुग्वेच्या कोलोनिया निकोलिचमध्ये दोन, दक्षिण अमेरिकेतील चिलीमधील क्विलिकुरा आणि सेरिलोस येथे एक डेटा सेंटर बांधण्यात आले आहे. बेल्जियममधील युरोपमधील सेंट गिस्लेन, फिनलंडमधील हॅमिना, आयर्लंडमधील डब्लिन, नेदरलँडमधील इमशेव्हन आणि ऍग्रीपोर्ट, डेन्मार्कमधील फ्रेडेरिशिया, स्वित्झर्लंडमधील झुरिच आणि पोलंडमधील वॉर्सा येथेही Google ची डेटा केंद्रे आहेत.

सिंगापूरच्या जुरोंग वेस्ट, तैवानच्या चांगहुआ काउंटी, ताइनान सिटी आणि युनलिन काउंटी आणि भारत येथे Google डेटा सेंटर आहे. Google डेटा सेंटरमधील एकूण सर्व्हरच्या संख्येबद्दल कोणताही अधिकृत डेटा नसला तरी, चार वर्षांपूर्वी आलेल्या अहवालात असे सुचवण्यात आले होते की Google चे तेव्हा 2.5 दशलक्ष सर्व्हर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT