Canada Dainik Gomantak
ग्लोबल

Canada: कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी, किमान वेतनात बंपर वाढ!

Canada: कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतात किमान वेतनात वाढ करण्यात आली असून, त्याचा लाभ आता लोकांना मिळणार आहे.

Manish Jadhav

Canada: कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतात किमान वेतनात वाढ करण्यात आली असून, त्याचा लाभ आता लोकांना मिळणार आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतात किमान वेतन $15.65 पर्यंत वाढवण्यात आले आहे.

पूर्वी किमान वेतन दर प्रति तास $15.20 होता. नवीन वेतन दर 1 जून 2023 पासून लागू होईल. त्याचा फायदा प्रवासी भारतीयांनाही मिळणार आहे.

विशेष म्हणजे, भारतातून मोठ्या संख्येने लोक रोजगार आणि अभ्यासासाठी कॅनडामध्ये जातात. कधीकधी लोक कॅनडामध्येच स्थायिक होतात.

वाढलेले किमान वेतन

कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामध्ये सर्वोच्च किमान वेतन दर 15.20 डॉलर प्रति तास होता. अशा स्थितीत, किमान वेतन दर 45 सेंटने वाढून $15.65 प्रति तास करण्यात आला आहे.

याप्रकरणी अर्थमंत्र्यांचे म्हणणे आहे की, आयोगाच्या अहवालाच्या आधारे सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा अहवाल प्रांतातील व्यापारी आणि इतर संबंधित लोकांकडून घेतलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

1 जूनपासून हा नियम लागू झाल्यानंतर कामगार आणि मजुरांना महागाईचा (Inflation) सामना करण्यास मदत होणार आहे. तसेच, ब्रिटिश कोलंबियामध्ये इतर प्रांतांपेक्षा जास्त लोक कामासाठी येतील.

अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घेतला

अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील कामगार संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयाचे स्वागत करत सरकारने (Government) किमान वेतनात वाढ केल्याचे कामगार संघटनांनी म्हटले आहे.

या निर्णयामुळे आम्ही आनंदी आहोत. पण तरीही महागाईला तोंड देण्यासाठी ते पुरेसे नाही. मजुराला यापेक्षा जास्त मजूरी मिळायली हवी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

Healthcare Facilities: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मोठा बदल! नर्सिंग महाविद्यालय जुन्या हॉस्पिसिओ इमारतीत हलविणार

SCROLL FOR NEXT