HIV
HIV Dainik Gomantak
ग्लोबल

Vaccine On HIV: गुड न्यूज! लवकरच येणार HIV या जालिम विषाणूवरील लस

Akshay Nirmale

Vaccine On HIV: एचआयव्ही एड्स (HIV/AIDS) च्या उपचारासाठी जगातील पहिली लस लवकरच उपलब्ध होऊ शकते. जागतिक एड्स दिनी सायन्स या जर्नलमध्ये याबाबतचे एक संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार एका लसीच्या क्लिनिकल चाचण्यांचे निष्कर्ष समोर आले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, ही लस एचआयव्ही विरोधात 97 टक्के प्रभावी आहे.

एक्वायर्ड इम्यूनो डेफिशिएन्सी सिंड्रोम (AIDS) हा आजार ह्यूमन इम्यूनो डेफिशिएन्सी वायरस (HIV) या विषाणुमुळे होते. विसाव्या शतकात हा विषाणु चिम्पांझींमधून माणसात आला असावा, असे मानले जाते. हा एक लैंगिक रोग आहे. सध्या त्यावर कोणतेही कायमस्वरूपी उपचार नाहीत.

या व्हॅक्सिनचे नाव eOD-GT8 60mer असे आहे. या व्हॅक्सिनच्या संशोधनात 18 ते 50 वयोगटातील 48 तंदुरूस्त लोकांवर याची चाचणी केली गेली. पहिला डोस 18 लोकांना दिला गेला, तर याचा दुसऱा डोस त्यानंतर आठ आठवड्यांनी दिला गेला. 18 रूग्णांना 8 आठवड्यात 100 मायक्रोग्रामचे दोन डोस दिले गेले. 12 जणांना सलाईन प्लेसिबो दिला गेला. प्लेसिबो औषध नाही. एखाद्या औषधाचा वापर एखाद्या व्यक्तीवर मानसिकदृष्ट्या किती आणि कसा पडतो, हे जाणून घेण्यासाठी करतात.

ज्या 36 जणांना लस दिली गेली होती त्यातील 35 जणांना लसीच्या पहिल्या डोसनंतरच परिणाम दिसून आला. त्यांच्यात पांढऱ्या रक्त पेशी म्हणजेच बी सेल्स वाढल्या. या पेशी आजारांविरोधात अँटीबॉडी बनवतात. लसीच्या दुसऱ्या डोसनंतर इम्युनिटी आणखी वाढली

इंटरनॅशनल एड्स व्हॅक्सीन इनिशिएटिव्हच्या डेटानुसार जगभरात 3 कोटी 80 लाख लोग HIV सह जीवन व्यतित करत आहेत. सध्या या जीवघेण्या विषाणुविरोधात जगात आत्तापर्यंत एड्समुळे 4 कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गतवर्षी 15 लाख लोकांना एड्स असल्याचे निदान झाले तर 6 लाख 50 हजार रूग्णांना जीव गमवावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

Vasco News : चिखलीत बिल्डरने अवैधपणे बनवली पार्किंगसाठी जागा

Pernem Rain : वादळी वाऱ्यामुळे पेडणे तालुक्यात पडझड सुरूच

Tihar Jail: तिहार जेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु

Supreme Court: ‘PM मोदींवर 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घाला’, सर्वोच्च न्यायालयात याचिका; वाचा नेमंक प्रकरण?

SCROLL FOR NEXT