Sudan Political Crisis
Sudan Political Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Sudan Crisis: सोन्याच्या खाणी सुदानसाठी ठरल्या अभिशाप, दोन जनरल समोरासमोर; वाचा गृहयुद्धाची संपूर्ण कहाणी

Manish Jadhav

Sudan Crisis: आफ्रिकन देश सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात युद्ध सुरु आहे. गेल्या सुमारे 10 दिवसांपासून हे युद्ध सुरु आहे.

मात्र, आंतरराष्ट्रीय दबावामुळे दोन्ही लष्करी दलांनी 72 तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. सुदानमध्ये अडकलेल्या इतर देशांतील नागरिकांनी देश सोडावा यासाठी ही युद्धबंदी लागू करण्यात आली आहे.

म्हणजे 72 तासांनंतर सुदानमध्ये पुन्हा जोरदार बॉम्बफेक सुरु होणार आहे. सुदानचे लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह अल-बुर्हान, जे सुदानचे राष्ट्राध्यक्ष देखील आहेत.

तर मोहम्मद हमदान डागालो, ज्यांना 'हेमेदती' म्हणूनही ओळखले जाते. निमलष्करी दल 'रॅपिड सपोर्ट फोर्स' आरएसएफचे प्रमुख डागालो हे सुदानमधील गृहयुद्धासाठी जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.

सोन्याच्या खाणी सुदानसाठी शाप ठरल्या

वास्तविक, सोन्याच्या खाणी सुदानसाठी शाप बनल्या आहेत. लष्कर आणि निमलष्करी यांच्यात सुरु असलेल्या गृहयुद्धात संपूर्ण देशच नव्हे तर तिथे राहणाऱ्या परदेशी नागरिकांचे जीवनही संकटात सापडले आहे.

परिस्थिती अशी आहे की, अनेक देश आपल्या नागरिकांना (Citizens) बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करत आहेत. भारतानेही आपल्या 534 नागरिकांना तेथून बाहेर काढले आहे.

सुदानमध्ये, सोन्याच्या खाणींवर कब्जा करण्यासाठी दोन लष्करप्रमुखांमध्ये वाद सुरु आहे. दोन्ही बाजूंच्या समर्थकांना या युद्धात जीव गमवावा लागत आहे.

सोन्याच्या खाणी ताब्यात घेण्यासाठी हे युद्ध सुरु आहे. आफ्रिका खंडात सर्वाधिक सोने सुदानमध्ये आढळते.

हे गृहयुद्धाचे खरे कारण आहे

सुदानच्या (Sudan) गृहयुद्धाचे खरे कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका अंदाजानुसार, सुदानमध्ये 40,000 ठिकाणी सोन्याचे उत्खनन होते.

येथे 13 राज्यांमध्ये 60 सोन्याच्या खाण कंपन्या काम करतात. 2022 मध्ये सोन्याच्या निर्यातीतून सुदानला 2.5 बिलियन डॉलर्सचे उत्पन्न मिळाले, पण आता हे सोनेच येथे युद्धाचे कारण बनले आहे.

सोन्याच्या उत्पादनावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध सुरु आहे. मात्र, सध्या सोन्याच्या खाणींवर निमलष्करी दलांचे वर्चस्व आहे.

दोन लष्करप्रमुखांमध्ये युद्ध कसे सुरु झाले हे देखील जाणून घ्या.

2019 मध्ये लोकांनी सुदानचे तत्कालीन अध्यक्ष ओमर अल-बशीर यांना सत्तेवरुन हटवण्यासाठी निदर्शने केली.

एप्रिल 2019 मध्ये लष्कराने राष्ट्रपतींना पदच्युत केले आणि देशात सत्तापालट केला.

2021 मध्ये पुन्हा सत्तापालट झाला आणि सुदानमध्ये लष्करी राजवट आली.

त्यानंतर लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह अल-बुरहान देशाचे राष्ट्रपती झाले आणि निमलष्करी दलाचे आरएसएफ नेते मोहम्मद हमदान डागालो उपराष्ट्रपती झाले.

सत्ता मिळाल्यानंतर या प्रमुखांमधील वाद वाढला. त्याचे आजच्या तारखेत युद्धात रुपांतर झाले आहे. दोघांमधील खऱ्या संघर्षाचे कारण सत्ता नसून सोने आहे. संपूर्ण आफ्रिकन खंडात सुदानमध्ये सोन्याचा सर्वात मोठा साठा आहे.

आकडेवारीनुसार, सुदानमध्ये 4000 हून अधिक सोन्याच्या खाणी आहेत.

सोन्याच्या खाणी 13 प्रांतांमध्ये पसरलेल्या आहेत, ज्यामुळे सुदान जगातील 10 वा सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे.

दुसरीकडे, देशातील सर्वात फायदेशीर सोन्याच्या खाणींवर निमलष्करी दल आरएसएफचे प्रमुख हेमेदती यांचे नियंत्रण आहे. हेमेदती केवळ सुदान सरकारलाच नव्हे तर शेजारील देशांनाही सोने विकतात. सोन्याच्या माध्यमातून कमाई करुन हेमेदती आपल्या सुरक्षा दलांना शस्त्रे आणि दारुगोळा पुरवतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT