Anurag Thakur  Dainik Gomantak
ग्लोबल

Asian Games: ‘ड्रॅगन’च्या कुरापती सुरुच, भारतीय खेळाडूंना प्रवेश नाकारला

चीनचा दाैरा रद्द : अनुराग ठाकूर

गोमन्तक डिजिटल टीम

Asian Games: अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावरून कुरापती काढणे चीनने सुरूच ठेवले आहे. चीनधील हांग् चौऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील तीन भारतीय खेळाडूंना जाणीवपूर्वक प्रवेश नाकारला आहे.

चीनच्या या अडेलतट्टू भूमिकेचा निषेध करण्यासाठी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही प्रस्तावित चीन दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अरुणाचलमधील या तीनही महिला खेळाडू ‘वुशू’ या क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होणार होत्या.

या महिला खेळाडूंना चीनच्या संकेतस्थळांवरून प्रवासासंबंधीची कागदपत्रे डाउनलोड करता आली नसल्याने त्यांना क्रीडास्पर्धांमध्ये सहभाग घेता येणार नाही, असे चिनी अधिकाऱ्यांनी म्हटले.

आम्ही निषेध करतो: बागची

‘‘अरुणाचल प्रदेश हा आमच्या देशाचा अविभाज्य भाग असून तो तसाच राहील. त्यामुळेच भारतीय नागरिकांना अधिवास आणि वांशिकतेच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीचा आम्ही निषेध करतो,’’ असेही बागची यांनी म्हटले आहे.

मध्यंतरी चीनने खोडसाळपणा करताना अरुणाचलला ‘दक्षिण तिबेट’ असे संबोधले होते तसेच त्यासाठी वेगळी भौगोलिक नावही देऊ केले होती.

म्हणे, कागदपत्रे डाऊनलोड झाली नाहीत!

1. ‘‘ नेमान वांग्सू, ओनिलू तेगा आणि मेपुंग लामगू या तीनही वुशू खेळाडूंना अधिस्वीकृतीची पत्रे मिळाली होती. या पत्रांनाच हांग् चौऊ आशियाई क्रीडा संयोजन समितीकडून दिल्या जाणाऱ्या एंट्री व्हिसाचा दर्जा देण्यात आला होता.

सहभागी खेळाडूंना ही कागदपत्रे संकेतस्थळावरून डाऊनलोड करणे गरजेचे होते. चीनहून मायदेशी येईपर्यंत ही कागदपत्रे वैध राहिली असती.

2. या तीनही खेळाडूंना ही कागदपत्रे संकेतस्थळावरून डाऊनलोड करता आलेली नाहीत. संबंधित खेळाडूंना संयोजन समितीकडून एकदा अधिस्वीकृतीची पत्रे मिळाली की त्यांचा आशियाई क्रीडा स्पर्धांना जाण्याचा मार्ग आपसूक मोकळा होतो.

पण या प्रकरणात केवळ तीन खेळाडूंचीच कागदपत्रे डाऊनलोड होऊ शकली नाहीत. त्यामुळे त्यांना प्रवासास जाता आले नाही.

याआधीही खोडसाळपणा

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याच तीन खेळाडूंना चेंग्दू येथे आयोजित ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स’मध्येही सहभागी होता आले नव्हते. यासाठी चीनकडून स्टेपल व्हिसाचा मुद्दा पुढे करण्यात आला होता.

चीनकडून स्टेपल व्हिसा दिला जाणे म्हणजे भारताचा अरुणाचल प्रदेशावरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. चीनच्या या कृत्याचा निषेध करत आठजणांच्या टीमने चेंग्दू येथील क्रीडा स्पर्धांमधून माघार घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT