PAssword Leak News X
ग्लोबल

Global Data Leak: धक्कादायक! 16 अब्ज लोकांच्या इंटरनेट खात्यांचे पासवर्ड, माहिती उघड; हँकिंगचा वाढला धोका

Internet Data Leak: इंटरनेटच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घटना असल्याचे मानले जात आहे. ही माहिती ‘सायबरन्यूज’ आणि ‘फोर्ब्ज’ने जाहीर केली आहे. हा प्रकार गंभीर आहे.

Sameer Panditrao

वॉशिंग्टन: जगभरातील १६ अब्ज इंटरनेट खात्यांची गोपनीय माहिती उघड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाखो वापरकर्त्यांची इंटरनेटशी संबंधित माहिती धोक्यात आली असून, त्यातून जगभरात हॅकिंग आणि ऑनलाइन गैरप्रकार वाढण्याची भीती आहे.

इंटरनेटच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घटना असल्याचे मानले जात आहे. ही माहिती ‘सायबरन्यूज’ आणि ‘फोर्ब्ज’ने जाहीर केली आहे. ही इंटरनेटवरील फक्त जुनी माहिती नाही, तर ‘इन्फोस्टेलर्स’सारख्या मालवेअरच्या मदतीने मिळवलेली नवी व संकलित माहिती यामध्ये आहे.

हे मालवेअर वापरकर्त्यांची नावे व पासवर्ड यांसह सर्व माहिती शांतपणे संकलित करत असतात आणि ते हॅकरना पाठवतात. हॅकरकडून ही माहिती थेट वापरली जाते किंवा डार्क वेबवर ती विकली जाते, असे सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कोठून चोरली माहिती?

उघड झालेल्या माहितीपैकी गूगल, फेसबुक आणि टेलिग्राम यांसारख्या ईमेल व सोशल मीडियावरील माहितीपासून काही सरकारी संकेतस्थळांवरील माहितीही चोरण्यात आली आहे. यामध्ये ३० मोठ्या सेवांमधील माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो वापरकर्त्यांची माहिती या हॅकरकडे आली आहे, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

सावधगिरीचा सल्ला

हॅकरकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती चोरण्यात आली, हा प्रकार गंभीर आहे, असे मानण्यात येते. बहुतांश जणांकडे मर्यादित तांत्रिक ज्ञान असते आणि त्यांचे पासवर्ड अगदी क्षुल्लक किमतीवर डार्कवेबवर उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे, इंटरनेटवरील प्रत्येक जण असुरक्षित झाला आहे, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. पासवर्डच्या पारंपरिक पद्धतीमध्ये बदल करत पास-कीसारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर करण्याच्या सूचना ‘गूगल’ने केल्या आहेत. अनोळखी व्यक्तीकडून आलेले एसएमएस किंवा ईमेल, विशेषतः लॉग-इनची माहिती विचारणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये, असा सल्ला ‘एफबीआय’ने दिला आहे.

काय काळजी घ्याल?

इंटरनेट वापरकर्त्यांनी तातडीने पासवर्ड बदलण्याच्या सूचना सायबरसुरक्षा तज्ज्ञांनी केल्या आहेत.

सर्व महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड अधिक मजबूत आणि युनिक कराव्यात.

पासवर्डचे ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ करून घ्यावे.

तुमची गोपनीय माहिती उघड झाली आहे का, हे डार्क वेब मॉनिटरिंग टूलवरूनही पाहता येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT