Internet Service In Goa: स्टेट्स ऑनलाईन! 12 तासानंतर गोव्यात इंटनेटसेवा पूर्ववत; CM सावंतांची मध्यस्थी

Internet In Goa: आजवर सुरू असलेल्या या अशा घटनांमुळे केबल ऑपरेटरना सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.
Internet Restored in Goa after 12 Hours
Internet Service In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केबल कापल्यामुळे तब्बल १.२० लाख ग्राहकांची ब्रॉडबॅण्ड आणि इंटरनेट सेवा बंद झाली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मंगळवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून शहरात पुन्हा केबल टाकण्याचे काम केबल व्यावसायिकांनी सुरू केले. रात्रभर काम करून तब्बल १२ तासांत इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली.

अखिल गोवा केबल आणि इंटरनेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर गोवेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे हा प्रश्न तात्पुरता सोडविण्यात आला. मात्र, कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे. आजवर सुरू असलेल्या या अशा घटनांमुळे केबल ऑपरेटरना सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

Internet Restored in Goa after 12 Hours
Maha Shivaratri In Goa: गोव्याच्या बीचवर महादेवाला दुग्धाभिषेक; 25 वर्षापासून परदेशी पर्यटक महाशिवरात्रीला लावतायेत हजेरी

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तीन महिन्यांत सोपस्कार पूर्ण करून काम करण्याचे आवाहन केले असून आम्ही ते करणार आहोत. आता पणजीत इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू झाली असल्याची पुष्टी त्यांनी केली.

'गोमन्तक'ला माहिती देताना वीज विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये म्हणाले की, सरकारने या कामासाठी दोन चांगले अधिकारी निवडले आहेत. आता ती जबाबदारी माझ्याकडे राहिली नसल्याने मी त्यावर बोलणे योग्य होणार नाही.

Internet Restored in Goa after 12 Hours
Viral Post: दिल्ली में तो पनीर सब जगह मिल जाता हैं! गोव्यातील रेस्टॉरंटमध्ये महिलेचा राडा; नेटकऱ्यांनी शिकवला 'कॉमन सेन्स'

...तर 80 कोटींची

वीज विभागाने केबल ऑपरेटर्सकडून मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुली करण्याचा निर्धार केला आहे. जारी केलेल्या नोटिसांनुसार सुमारे ८० कोटी रुपयांची थकबाकी वसूल होईल, अशी माहिती काशिनाथ शेट्ये यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com