Qatar PM  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: पॅलेस्टिनींबाबत कतारचे पंतप्रधान झाले भावूक, इस्रायलवर डागले टीकास्त्र; म्हणाले...

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. हमासने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. हमासने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. यामध्ये 1000 हून अधिक इस्रायली मारले गेले होते. तेव्हापासून इस्रायली सैन्य गाझामध्ये बॉम्बहल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत सुमारे 25 हजार लोक मारले गेले आहेत. या विध्वंसाबद्दल कतारचे पंतप्रधान भावूक झाले. पंतप्रधान म्हणाले की, आता गाझा संपला आहे. 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर दिल्याने गाझामधील सुमारे 23 लाख लोकांना घरे सोडून विस्थापित व्हावे लागले.

कतारच्या पंतप्रधानांनी इस्रायलवर जोरदार टीका केली

कतारच्या पंतप्रधानांनी इस्रायलसह आंतरराष्ट्रीय समुदायावर जोरदार टीका केली. शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी म्हणाले की, ''हा संघर्ष थांबवण्याचा टू स्टेट फॉर्म्युला हाच एकमेव पर्याय आहे. इस्रायल ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहे, त्यावरुन असे दिसते की आता या भागात शांतता राखणे खूप कठीण झाले आहे.'' कतारचे पंतप्रधान यावेळी दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला संबोधित करत होते.

ते पुढे म्हणाले की, 'आता गाझा संपला आहे. याचा अर्थ आता तिथे काहीच उरले नाही. आजूबाजूला बॉम्बस्फोटाच्या खुणा आहेत. दूर-दूरवर माणसं दिसत नाहीत.' ते पुढे असेही म्हणाले की, ''जोपर्यंत इस्रायली सरकार आणि नेते दोन राष्ट्रांच्या अस्तित्वासाठी तयार होत नाहीत, तोपर्यंत टू स्टेटवर तोडगा अशक्य आहे. युद्ध थांबवल्याशिवाय कोणताही सकारात्मक पुढाकार घेता येणार नाही.'' मध्यपूर्वेतील हुथींच्या दहशतीबाबत ते म्हणाले की, 'परिस्थिती बिकट होत चालली आहे. या संपूर्ण परिसरात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.'

यूएननेही चिंता व्यक्त केली

या परिषदेत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, ''गाझामध्ये उपासमारीची स्थिती निर्माण झाली आहे. रोगराईचा धोका वाढला आहे. गाझामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करण्यात आले. एवढचं नाही तर संयुक्त राष्ट्र मानवतावादी मदत देखील योग्यरित्या पोहोचवू शकत नाही.'' इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणतात की, युद्ध संपल्यानंतर पॅलेस्टिनी गाझावर राज्य करतील. त्याचवेळी, जेरुसलेम आणि वेस्ट बँकप्रमाणेच इस्रायलही गाझावर वर्चस्व गाजवेल, असे अरब देशांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: कामुर्लीच्या उपसरपंच्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

IFFI 2024: मराठी कलाकारांची 'शोलेला' मानवंदना! अभिनेत्री प्राजक्ता दातारने म्हणला Iconic Dialogue; ‘बसंती, इन कुत्तों के सामने..'

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

SCROLL FOR NEXT