Ganesh Visarjan 2021: Indians wave goodbye to beloved Bappa in Germany Dainik Gomantak
ग्लोबल

Ganesh Visarjan 2021: जर्मनीत लेझीम, ढोलताश्याच्या गजरात लाडक्या बाप्पांला निरोप

कॅनडा, मॉरिशस, थायलंड, सिंगापूर, कंबोडिया, बर्मा, युनायटेड सारख्या परदेशात स्थायिक झालेले भारतीय सुद्धा गणेशोत्सव जल्लोशात साजरा करतात.

दैनिक गोमन्तक

दरवर्षी, भाद्रपद महिन्यात येणारे सण उत्सव अख्या जगभर साजरे केले जातात अस म्हणायला हरकत नाही. कारण जर्मनीत (Germany) नुकताच गणेश विसर्जनाचा (Ganesh Visarjan 2021) उत्सव ढोलताशाच्या पथकासह धुमघडाक्यात साजरा करण्यात आला. मराठी भाद्रपद महिना म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण संपूर्ण भारतात (India) अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

भारताताील इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा येथे पारंपारिक पद्धतीने आणि लोकप्रियतेने हे सणोत्सव साजरे केले जातात. या उत्सवाबाबत विशेष सांगायचे झाले तर कॅनडा, मॉरिशस, थायलंड, सिंगापूर, कंबोडिया, बर्मा, युनायटेड सारख्या परदेशात स्थायिक झालेले भारतीय सुद्धा हा सण परदेशात जल्लोशात साजरा करतात. आणि अमेरिके सारख्या परदेशात साजरा होणारा हा उत्सव एक आकर्षण ठरले आहेत.

दोन दिवसा आधी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी बर्लिनचे रस्ते गणपती च्या जल्लोशात उजळून निघाले होते. जर्मनीमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी गणपती बाप्पाला अगदी धुमघडाक्यात निरोप दिला.

बर्लिनमधील हसेनहाइड मध्ये असलेल्या गणेश मंदिरात गणेश उत्सव आयोजित करण्यात आला होता, हे मंदिर तेथील भारतीय समुदायाच्या प्रयत्नांनी बर्लिनच्या मध्यभागी बांधले गेले आहे.

हैदराबादचे रहिवासी गिलियन वुडमन, जर्मनीला पर्यावरण व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी गेल्या आणि त्यांनी IBTimes शी या कार्यक्रमाबद्दलचा उत्साह शेअर केला.

"हे उत्साहवर्धक वातावरण होते. एका वर्षापेक्षा जास्त काळ लॉकडाऊन आणि निर्बंधांनंतर, इतक्या लोकांना आनंदाने हा उत्सव सादरा करतांना पाहून आश्चर्य वाटले. बर्लिनच्या रस्त्यांवरून प्रत्यक्षात एक मिरवणूक निघाली जी खूप अनोखी होती, एकूणच हा एक अतिशय व्यवस्थित आणि नियमांचे पालन करून केलेला कार्यक्रम होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक या उत्साहात सहभागी होणार हे अपेक्षित नव्हते," असे गिलियन वुडमन यांनी सांगितले.

विसर्जन सोहळ्याला सुमारे 300 लोक उपस्थित होते.

"बर्लिनचा रहिवासी असलेल्या माझ्या एका मित्राने मला सांगितले की ढोल पथकाच्या आवाजामुळे जमिन हादरली होती लोकांचे पाय थिरकायला लागले होते. बर्लिनच्या रस्त्यावर पारंपारिक लोकनृत्ये पाहून जर्मनीमध्ये राहणारे स्वतंत्र माध्यम संवाददाता निमिष सावंत, थक्क झाले.

"बर्लिनच्या इतिहासात या मिरवणूकीची नोंद होइल अशी ही मिरवणूक होती. केवळ महाराष्ट्रीयनच नाही तर प्रत्येक भारतीय समाजातील लोक आणि इतर देशांचे लोकंही मिरवणुकीत सहभागी होण्यास उत्सुक आहेत. श्री हिंदू गणेश मंदिरात हा गणेश मूर्ती उत्सव असेल ही मुर्ती पालखीमधून मिरवणुकीसाठी नेले जाईल, असे अमित सोमानी यांनी लोकमतला सांगितले होते.

अहवालानुसार, तिथल्या एका मराठी मित्र बर्लिन, संस्थेने जर्मनीला मागील वर्षीच्या समारंभात ढोल परफॉर्मन्सची ओळख करून दिली, या वर्षी या पथकात महिला लेझीम पथक (कलाकार) आणल्या गेले. कारण लेझीम हे महाराष्ट्रातील पारंपरिक लोकनृत्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT