Coup  Dainik Gomantak
ग्लोबल

Gabon Coup: आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत देशामध्ये 'तख्तापालट', नायजरनंतर...

Gabon: आफ्रिकेतील नायजरनंतर आता गॅबॉनमध्ये सत्तापालट झाला आहे. हा एक पश्चिम आणि मध्य आफ्रिकन देश आहे, जिथे सैन्याने नायजर स्टाइलमध्ये सत्तापालट केला.

Manish Jadhav

Gabon Army: आफ्रिकेतील नायजरनंतर आता गॅबॉनमध्ये सत्तापालट झाला आहे. हा एक पश्चिम आणि मध्य आफ्रिकन देश आहे, जिथे सैन्याने नायजर स्टाइलमध्ये सत्तापालट केला.

गेल्या चार वर्षांत अनेक आफ्रिकन देश सत्तापालटांचे बळी ठरले आहेत. यापूर्वी गिनी, सुदान, बुर्किना फासो, चाड आणि अलीकडे नायजरमध्ये सत्तापालट झाल्याची चर्चा रंगली होती.

दरम्यान, गॅबॉन हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध देश आहे. हा देश अटलांटिक महासागराने वेढलेला आहे, कॅमेरुन, इक्वेटोरियल, गिनी आणि काँगो यांच्या सीमेवर आहे.

कोणत्याही देशाशी तुलना केल्यास, क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश युनायटेड किंग्डमपेक्षा मोठा आहे, तर अमेरिकन राज्य कोलोरॅडोपेक्षा लहान आहे. येथील 88 टक्के क्षेत्र जंगल असले तरी येथे बोलली जाणारी मुख्य भाषा फ्रेंच आहे.

आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत आणि तरुण देशांपैकी

खनिज आणि तेलाचे साठे आणि कमी लोकसंख्येमुळे गॅबॉनची गणना आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत देशांमध्ये केली जाते. 2021च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 23 दशलक्ष होती.

विशेष म्हणजे, आफ्रिकन देशांच्या तुलनेत या देशात शहरीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, गॅबॉनमधील पाच नागरिकांपैकी (Citizens) चार नागरिक शहरी भागात राहतात.

देशाच्या 60 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या लिब्रेव्हिल आणि पोर्ट जेंटिल शहरांमध्ये राहते. याशिवाय, गॅबॉनच्या लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या 20 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. खनिज आणि तेलाच्या साठ्यांव्यतिरिक्त हा देश जैवविविधता आणि राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध आहे.

एका पक्षाचे वर्चस्व

गॅबोनीज डेमोक्रॅटिक पक्षाचे गॅबॉनच्या राजकारणावर वर्चस्व आहे. 1960 मध्ये फ्रान्सपासून स्वतंत्र झाल्यानंतर, ल्योन एमबी हे त्याचे पहिले अध्यक्ष झाले.

1967 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, ओमर बोंगोने सत्ता हस्तगत केली आणि गॅबोनीज डेमोक्रॅटिक पार्टी विसर्जित करुन पार्टी डेमोक्रॅटिक गॅबोनाइसची स्थापना केली.

ओमर बोंगोने हा एकल राष्ट्रीय पक्ष घोषित केला आणि 2009 पर्यंत सातत्याने सत्तेत राहिला. यानंतर त्यांचा मुलगा ओमर बोंगो ओंडिंबा राष्ट्राध्यक्ष झाला. तेव्हापासून ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.

आफ्रिकेत सर्वाधिक सत्तापालट

जगात सर्वाधिक सत्तापालटाच्या घटना आफ्रिकन देशांमध्ये होतात, नुकतेच नायजरमधील (Niger) सत्तापालटाची बाब समोर आली होती, याआधी गिनी, सुदान, बुर्किना फासो आदी देशांमध्ये हे सत्तापालट झाले आहे.

आकडेवारीनुसार, गॅबॉनसह आफ्रिकन देशांमध्ये एकूण 216 सत्तापालटाचे प्रयत्न झाले आहेत, ज्यामध्ये 108 वेळा ते यशस्वी झाले आणि तेवढ्याच वेळा अयशस्वी झाले.

यानंतर लॅटिन अमेरिकेचा क्रमांक येतो, जिथे आतापर्यंत 146 वेळा सत्तापालटाचा प्रयत्न करण्यात आला आहे, ज्यामध्ये 70 वेळा ते यशस्वी झाले आहेत. पूर्व आशियामध्ये 49, मध्य पूर्वमध्ये 44, युरोपमध्ये 17 आणि दक्षिण आशियामध्ये 16 सत्तापालटाचे प्रयत्न झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT