Hunter Biden Private Photos Leak: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे पुत्र हंटर बायडन यांच्या लॅपटॉपमधून मार्को पोलो या उजव्या विचारसरणीच्या गटाने सुमारे 9,000 फोटो लीक केले आहेत.
BidenLaptopMedia.com (BidenLaptopMedia.com) वर हंटर यांचे ड्रग्ज घेताना, वेश्यांसोबत मस्ती करतानाचे 8,864 फोटो आणि त्यांच्या कुटुंबीयासोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांची पत्नी जिल बायडन देखील दिसत आहेत.
डेली मेलच्या वृत्तानुसार, हे फोटो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचे पुत्र हंटर बायडन यांच्या लॅपटॉपमधून लीक करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, हे सर्व फोटो 2008 ते 2019 मधील आहेत. हे हवाई, काबो सॅन लुकास, कोसोवो, चीन, लंडन, पॅरिस, रोम आणि जगभरातील इतरत्र घेतले गेले आहेत.
अहवालानुसार, एकूण प्रकाशित 9,000 फोटोंपैकी बहुतांश फोटो हंटर यांच्या मॅकबुक प्रो iPhoto अॅपवरुन घेतलेले आहेत. एकूण 7,032 MacBook Pro च्या iPhoto अॅपवरुन घेतले गेले, तर 1,832 त्यांच्या iPhone XS बॅकअपमधून घेतले गेले.
याशिवाय, 428 'लाइव्ह फोटो' (आयफोनवर घेतलेले छोटे व्हिडिओ), टेक्स्ट मेसेजमध्ये पाठवलेल्या 674 इमेज, 579 स्क्रीनशॉट, व्हॉट्सअॅपद्वारे पाठवलेल्या 40 इमेजेसचा समावेश आहे.
प्रकाशित फोटोंमध्ये हंटर बायडन ड्रग्ज घेताना दिसत आहेत. तसेच वेश्यांसोबत सेक्स करतानाच्या शेकडो फोटो यामध्ये आहेत. या फोटोंमध्ये, हंटर गांजाचे वेप पेन धरलेले दिसत आहे. जरी याआधी त्यांनी हे मान्य केले आहे की, ते अनेक वर्षांपासून कोकेनच्या व्यसनाचे बळी ठरले आहेत.
प्रकाशित फोटोंमध्ये ते हॉटेलमधील डेस्कच्या मागे दोन महिलांसोबत नग्न अवस्थेत दिसत आहे. या फोटोंमध्ये हंटर यांच्या अंगावर कपडेही दिसत नाहीत.
हंटर यांच्या अनेक आक्षेपार्ह फोटोंमध्ये त्यांचे काही कौटुंबिक फोटोही प्रसिद्ध झाले आहेत, ज्यामध्ये जो बायडनही दिसत आहेत. काही फोटोंमध्ये जो बायडन यांची पत्नी जील बायडन आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे.
मार्को पोलोची स्थापना 28 वर्षीय ट्रम्प व्हाईट हाऊसचे माजी कर्मचारी गॅरेट झिगलर यांनी केली आहे. मार्को पोलो 'भ्रष्टाचार आणि ब्लॅकमेलचा पर्दाफाश करणारा गट' असल्याचा दावा करतो.
फोटो प्रकाशित करताना झिगलर म्हणाले की, जर अमेरिकन लोकांना राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे कुटुंब कसे आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर ते हे फोटो पाहू शकतात.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, प्रकाशित फोटोंमध्ये हंटर यांच्या 459 गुन्ह्यांचा आरोप आहे. वेश्याव्यवसायाच्या गुन्ह्यांसह, ड्रग्जचे वितरण, सरकारी संस्थांची फसवणूक करणे, बेकायदेशीर परदेशी लॉबिंग आणि मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) इत्यादी...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.