Baba Vanga
Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga: '...भारतातील दुष्काळापर्यंत', बाबा वेंगाची 5 भाकिते

दैनिक गोमन्तक

Baba Vanga Predictions For 2023: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते. 2022 या वर्षासाठी केलेल्या भाकितांपैकी आतापर्यंत 2 भाकिते खरी ठरली आहेत. यानंतर आता लोकांना बाबा वेंगा यांनी 2023 बद्दल केलेल्या भविष्यवाणीबद्दल जाणून घ्यायचे आहे. चला तर मग अशाच काही भाकितांबद्दल जाणून घेऊया:-

जगाच्या अंताची भविष्यवाणी

द सनच्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांनीही जगाच्या अंताची भविष्यवाणी केली होती. 5079 मध्ये जगाचा अंत होईल, असे त्या म्हणाल्या होत्या.

2023 मध्ये काहीतरी मोठे घडणार

2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलेल, असा बाबा वेंगाचा अंदाज होता. याचा थेट परिणाम पृथ्वीवर होईल.

भारताबद्दल अंदाज

बाबा वेंगा यांनी भारताबाबतही (India) भाकीत केले होते, असे म्हटले जाते. 2022 मध्ये भारतात उपासमारीची परिस्थिती निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले होते. जगभरात तापमानात घट होणार असून, त्याचा परिणाम भारतावरही होणार आहे. भारतात पिकांवर टोळांचा हल्ला होईल, त्यामुळे उपासमार वाढेल.

आपल्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती

बाबा वेंगाच्या अनुयायांचा असा विश्वास होता की, त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या अचूक तारखेचा अंदाज वर्तवला होता. त्यांचा मृत्यू 11 ऑगस्ट रोजी होईल आणि 13 ऑगस्ट रोजी दफन केले जाईल.

बराक ओबामा बद्दल अंदाज

अमेरिकेचे (America) 44 वे राष्ट्राध्यक्ष आफ्रिकन-अमेरिकन असतील, असे भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवले होते. विशेष म्हणजे, अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT