Roya Karimi Dainik Gomantak
ग्लोबल

Bodybuilder Roya Karimi: 14व्या वर्षी लग्न, 15व्या वर्षी आई... 'तालिबानी' बंधनं झुगारुन 'रोया करीमी' बनली टॉपची बॉडीबिल्डर; आज जगभर होतेय चर्चा

Who Is Roya Karimi: युरोपमधील टॉप बॉडीबिल्डर्सपैकी एक असलेली रोया करीमी सध्या जागतिक स्तरावर चर्चेत आहे.

Manish Jadhav

Who Is Roya Karimi: युरोपमधील टॉप बॉडीबिल्डर्सपैकी एक असलेली रोया करीमी सध्या जागतिक स्तरावर चर्चेत आहे. ती स्पेनमधील बार्सिलोना येथे सुरु असलेल्या जागतिक बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये नॉर्वेचे प्रतिनिधित्व करत आहे. रोयाचे चर्चेत येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिचा प्रेरणादायी आणि संघर्षमय प्रवास. ती मूळची अफगाणिस्तानची असून अल्पवयात तिचे लग्न झाले आणि ती लवकरच आई बनली, मात्र तिने या परिस्थितीपुढे गुडघे न टेकता आपल्या जिद्द आणि कठोर परिश्रमातून बॉडीबिल्डिंगच्या जगात मोठे नाव कमावले.

जीवनात काहीतरी मोठे करण्याची तीव्र इच्छाशक्ती बाळगून, रोया हिने नशिबापुढे कधीही हात टेकले नाहीत आणि अथक मेहनतीने बॉडीबिल्डिंगमध्ये यश मिळवले, ज्याचे अनेकांना केवळ स्वप्न पडते.

अफगाणिस्तानातील कठोर आयुष्य आणि बालविवाह

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे जन्मलेल्या रोया करीमीचे कुटुंब अत्यंत कठोर सामाजिक आणि धार्मिक नियमांचे पालन करणारे होते. दुर्दैवाने, वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी रोयाचे लग्न लावून देण्यात आले. पुढील वर्षातच ती एका मुलाची आई झाली. हा 2011 सालचा काळ होता.

त्यावेळी अफगाणिस्तानात जरी तालिबानचे अधिकृत शासन नसले तरी, महिलांना अनेक कठोर 'तालिबानी' नियमांचा सामना करावा लागत होता. घरात आणि समाजात महिलांवर अनेक निर्बंध होते. रोयाही या निर्बंधांना बळी पडली आणि तिला आपल्या स्वप्नांना मारुन जगावे लागत होते. या घुसमटणाऱ्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी तिने मोठा धोका पत्करला आणि अफगाणिस्तानमधून पळून जाण्याचा धाडसी निर्णय घेतला.

नॉर्वेत जीवनाची नवी दिशा

अफगाणिस्तानमधून पळून गेलेली रोयाला युरोपमधील शांत देश नॉर्वेमध्ये आश्रय मिळाला. नॉर्वेमध्ये तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. नॉर्वेमध्ये तिने आपले शिक्षण पुन्हा सुरु केले आणि नर्सिंग या वैद्यकीय क्षेत्राला आपले करिअर म्हणून निवडले. तिने नर्सिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. नर्सिंगच्या व्यस्त वेळापत्रकात केवळ शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी तिने बॉडीबिल्डिंगचा सराव सुरु केला. स्वतः रोया हिने एका मुलाखतीत कबूल केले की, तिने हे केवळ फिटनेससाठी सुरु केले होते. मात्र, शरीराला तंदुरुस्त ठेवता ठेवता कधी ती बॉडीबिल्डिंगमध्ये इतकी रमून गेले की, आपले मागील सर्व दुःख विसरुन गेली, हे तिला कळलेच नाही.

विक्रमी यश आणि जागतिक ओळख

2024 मध्ये रोयाने नर्सिंगची नोकरी (Job) सोडून दिली आणि बॉडीबिल्डिंगला पूर्णवेळ करिअर म्हणून स्वीकारले. केवळ 18 महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर रोयाने बॉडीबिल्डिंगच्या जगात एकापाठोपाठ एक मोठे यश मिळवले. वयाच्या 30व्या वर्षी तिने 'स्टोपेरिएट ओपन बॉडीबिल्डिंग' स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर तिने नॉर्वे क्लासिक 2025 चॅम्पियनशिप देखील जिंकली. युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये आपल्या उत्कृष्ट फिटनेस आणि साधेपणाने सर्वांना आकर्षित करुन तिने थेट जागतिक बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली. दरम्यान, तिने तिचे बॉडीबिल्डिंगचे प्रशिक्षक कमल जलालुद्दीन यांच्याशी लग्नगाठ बांधली.

या यशाच्या प्रवासात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः बॉडीबिल्डिंगच्या ड्रेसवरुन तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या, पण तिने त्याची कधीही पर्वा केली नाही. रोया करीमीचा हा प्रेरणादायक प्रवास सिद्ध करतो की, कोणत्याही परिस्थितीत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश नक्कीच मिळते. अत्यंत कठीण परिस्थितीतून संघर्ष करत रोयाने मिळवलेले यश, हे जगभरातील महिलांसाठी (Womens) एक मोठी प्रेरणा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

"7000 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह!", कर्नाटकातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये अलर्ट; दोन वर्षात बाधितांचा आकडा 66 हजारांच्या पार

Goa Monsoon Rainfall 50 Inches: गोव्यात तब्बल 58 दिवसांनंतर पावसाच्या इंचाचे अर्धशतक; गतवर्षीच्या तुलनेत यंदा 16 दिवस अधिक, 31 जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा

Goa Russian Woman Visa Case: आईला हद्दपार करण्यापूर्वी मुलींच्या अश्रूंचाही विचार करा! मुंबई हायकोर्टाकडून केंद्राला मानवतावादी दृष्टिकोनाचे निर्देश

Commonwealth Games 2026: सैन्यात भरती होण्यासाठी धावायचा, आज बनला देशाचा हिरो! गुलवीर सिंहने रचला इतिहास; 10,000 मीटर शर्यतीत जिंकलं 'सिल्व्हर' पदक

SCROLL FOR NEXT