Israel-Hamas Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas: 'जो गुन्हा हमास गाझामध्ये करत आहे, तो उद्या जगात कुठेही...' युद्धविरामच्या वक्तव्यावर इस्राइलचे प्रत्युत्तर

दैनिक गोमन्तक

Israel-Hamas: इस्राइल-हमासमधील संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने इतर देशांनी चिंता व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला गाझामध्ये युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे . त्यांनी म्हटले आहे की, 'इस्रायलने गाझामधील लहान मुले आणि महिलांची हत्या थांबवावी.'

मॅक्रॉन म्हणाले की बॉम्बस्फोटासाठी फ्रान्स कोणलाही समर्थन देणार नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर इस्रायलने या आवाहनावर तीव्र प्रतिक्रिया देत 'हमास आज गाझामध्ये जे गुन्हे करत आहे ते उद्या पॅरिस, न्यूयॉर्क आणि जगात कुठेही केले जातील,' असे म्हटले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मॅक्रॉन म्हणाले, 'इस्रायलचा स्वतःच्या सुरक्षेचा अधिकार ओळखून आम्ही त्यांना गाझामधील हा बॉम्बस्फोट थांबवण्याचे आवाहन करतो.' याबरोबरच मॅक्रॉन यांनी यावरही जोर दिला की फ्रान्स हमासच्या 'दहशतवादी' कृत्यांचा 'निःसंदिग्धपणे निषेध' करतो. इस्रायल, अमेरिका, ब्रिटन आणि इतर पाश्चात्य देशांप्रमाणेच फ्रान्सही हमासला दहशतवादी संघटना मानतो.

मॅक्रॉन म्हणाले, 'खरंच - आज, नागरिकांवर बॉम्बफेक होत आहे. लहान मुले, महिला, वृद्ध लोकांवर बॉम्बफेक करून त्यांना मारले जाते. त्यामुळे आम्ही इस्रायलला हे थांबवण्याचे आवाहन करतो. आंतरराष्ट्रीय कायदा मोडला की नाही हे ठरवण्याची आपली भूमिका नाही, असंही त्यांनी म्हटले आहे.

इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार लष्करी हल्ले करत असल्याचा दावा करत आहे आणि हल्ले करण्यापूर्वी इशारे देणे आणि लोकांना तेथून बाहेर पडण्यास सांगणे यासारखी नागरी जीवितहानी कमी करण्यासाठी पावले उचलत आहे.

मॅक्रॉन यांच्या वक्तव्यावर इस्रायलने ही प्रतिक्रिया दिली

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मॅक्रॉन यांच्या वक्तव्यावर म्हटले आहे की, देशांनी इस्रायल नव्हे तर हमासचा निषेध केला पाहिजे.

नेतन्याहू यांच्या कार्यालयातून एका निवेदनात म्हटले आहे की, 'हमास आज गाझामध्ये जे गुन्हे करत आहे ते उद्या पॅरिस, न्यूयॉर्क आणि जगात कुठेही केले जातील.' असे म्हणत फ्रान्सच्या मतावर नाराजी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT