Russia: बलात्कारानंतर गर्लफ्रेंडची हत्या, चाकूने केले 111 वार; राष्ट्रपती पुतिन यांनी मारेकऱ्याला दिली माफी

Vladimir Putin Pardons Girl Friend Rapist Killer: 27 वर्षीय मॉन्स्टर व्लादिस्लाव कन्यास असे मारेकऱ्याचे नाव असून त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव 23 वर्षीय वेरा पेखटेलेवा आहे, जिच्यावर त्याने सुमारे 3 तास अत्याचार केले.
Vladimir Putin Pardons Girl Friend Rapist Killer
Vladimir Putin Pardons Girl Friend Rapist KillerDainik Gomantak
Published on
Updated on

Vladimir Putin Pardons Girl Friend Rapist Killer: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या गर्लफ्रेंडवर बलात्कार करुन तिची 111 वार करुन हत्या करणाऱ्या व्यक्तीला माफ केले आहे. 27 वर्षीय मॉन्स्टर व्लादिस्लाव कन्यास असे मारेकऱ्याचे नाव असून त्याच्या गर्लफ्रेंडचे (Girlfriend) नाव 23 वर्षीय वेरा पेखटेलेवा आहे, जिच्यावर त्याने सुमारे 3 तास अत्याचार केले.

तिच्यावर बलात्कार केल्यानंतर चाकूने वार करुन तिची हत्या केली. तिचा गळा दाबून खून करण्यात आला. देशासाठी युक्रेन युद्धात भाग घेतला म्हणून एका व्यक्तीला इतक्या क्रूरपणे मारणाऱ्या व्यक्तीला पुतिन यांनी माफ केले.

पीडितेच्या आईने पुतिन यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना (Police) 7 वेळा कॉल केला, परंतु ते वेरा पेखटेलेवाला वाचवू शकले नाहीत. मानवाधिकार प्रचारक अ‍ॅलोना पोपोवा यांनी सांगितले की, न्यायालयाने हा खटला 'विशेषत: क्रूर हत्या' म्हणून घोषित केला होता, परंतु पीडितेची आई 49 वर्षीय ओक्साना यांनी आपल्या मुलीच्या मारेकऱ्याला माफ करण्याच्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केली.

ओक्साना यांनी विचारले की, एका निर्दयी खुन्याला युद्ध लढण्यासाठी शस्त्रे कशी दिली जाऊ शकतात? रशियाच्या बचावासाठी त्याला आघाडीवर का पाठवले आहे? तो माणूस नाही.

Vladimir Putin Pardons Girl Friend Rapist Killer
Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर पुन्हा डागली क्षेपणास्त्रे, हल्ल्यात 48 जणांचा मृत्यू

पुतिन यांनी 28 ऑक्टोबर रोजी आदेश दिला

ओक्साना म्हणाल्या की, 'हा माझ्यासाठी मोठा धक्का आहे, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी खुन्याला माफी देण्याचा आदेश दिला आहे…सर्व काही माझ्याकडून काढून घेतले गेले आहे - माझे जीवन, माझी जगण्याची आशा. मी आता जिवंत नाही, माझे अस्तित्व संपले आहे.

तिच्या मारेकऱ्याला निर्दोष मुक्त करण्यात आले, त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड समाप्त केला. हा निर्णय आमच्यासाठी दु:खद आहे. तो मारेकरी मला आणि माझ्या कुटुंबीयांना कधीही मारु शकतो.' 28 ऑक्टोबर रोजी पुतिन यांनी मारेकऱ्याला पूर्णपणे माफ केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com