Earthquake Prediction Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Frank Hoogerbeets Earthquake Prediction: हुगरबीट्स यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे असे म्हटले की, गेल्या दोन दिवसांत ग्रहांच्या विशिष्ट मांडणीमुळे आणि चंद्राच्या प्रभावामुळे पृथ्वीवर भूकंपाचे अनेक धक्के आधीच जाणवले आहेत.

Manish Jadhav

Frank Hoogerbeets Earthquake Prediction: तुर्की आणि सीरियात 2023 मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर जगभरात चर्चेत आलेले डच संशोधक फ्रँक हुगरबीट्स यांनी पुन्हा एकदा एका मोठ्या भूकंपाचा इशारा दिला, ज्यामुळे सोशल मीडियावर भीती व्यक्त केली जात आहे. 'सोलर सिस्टम जॉमेट्री सर्व्हे' (SSGEOS) शी संबंधित असलेल्या हुगरबीट्स यांनी ग्रहांची स्थिती आणि चंद्राच्या हालचालींचा संदर्भ देत 10 मार्चच्या सुमारास जगात कुठेही मोठ्या तीव्रतेचा भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवली. त्यांच्या या दाव्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी वैज्ञानिक समुदायाने मात्र हे दावे फेटाळून लावत याला 'छद्मविज्ञान' (Pseudoscience) ठरवले.

हुगरबीट्स यांनी सोशल मीडियावर (Social Media) एका पोस्टद्वारे असे म्हटले की, गेल्या दोन दिवसांत ग्रहांच्या विशिष्ट मांडणीमुळे आणि चंद्राच्या प्रभावामुळे पृथ्वीवर भूकंपाचे अनेक धक्के आधीच जाणवले आहेत. त्यांच्या मते, ग्रहांची भूमितीय स्थिती पृथ्वीच्या भूगर्भीय हालचालींवर प्रभाव टाकू शकते आणि त्यातूनच मोठ्या भूकंपाची निर्मिती होऊ शकते. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये विशिष्ट आलेखांचा आधार घेत 10 मार्चच्या आसपासची वेळ अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगितले. तुर्की-सीरिया भूकंपाच्या वेळी हुगरबीट्स यांनी अशाच प्रकारची विधाने केली होती, जी योगायोगाने खरी ठरली होती. तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक विधानाकडे जगभरातील नेत्यांचे आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागून असते.

मात्र, हुगरबीट्स यांच्या या दाव्यांवर जगभरातील भूगर्भशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञांनी सडकून टीका केली. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त संस्थेच्या मते, भूकंपाची (Earthquake) अचूक वेळ, तारीख आणि ठिकाण सांगणे सध्याच्या विज्ञानानुसार अशक्य आहे. जगातील कोणतीही वैज्ञानिक संस्था किंवा शास्त्रज्ञ आतापर्यंत अशा प्रकारचे अचूक भाकीत करु शकलेला नाही. शास्त्रज्ञ केवळ ऐतिहासिक आकडेवारी आणि भूगर्भीय अभ्यासाच्या आधारावर एखाद्या विशिष्ट प्रदेशात दीर्घकाळात भूकंप होण्याची 'शक्यता' वर्तवू शकतात, परंतु 'नक्की कधी' हे सांगणे विज्ञानाच्या कक्षेबाहेर आहे. हुगरबीट्स ज्या ग्रहांच्या स्थितीचा आधार घेतात, त्या पद्धतीला विज्ञानात कोणताही आधार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अनेकांनी हुगरबीट्स यांच्यावर लोकांमध्ये भीती पसरवल्याचा आरोप केला. सोशल मीडियावरील अनेक यूजर्संनी त्यांच्या या इशाऱ्याला अफवा मानून त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. विज्ञानाच्या नावाखाली लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे चुकीचे असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले.

भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी भाकितांवर विसंबून राहण्यापेक्षा आपत्ती व्यवस्थापन, इमारतींचे बांधकाम भूकंपरोधी करणे आणि प्रशासकीय सज्जता ठेवणे हाच अधिक प्रभावी मार्ग असल्याचे वैज्ञानिक संस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे, अशा प्रकारच्या दाव्यांवर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगावी आणि केवळ अधिकृत वैज्ञानिक माहितीवरच विसंबून राहावे, असा सल्ला प्रशासनाकडून दिला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT