France president Emmanuel Macron Dainik Gomantak
ग्लोबल

फ्रान्स सरकारचा मोठा निर्णय; देशभरात कोविड पास सिस्टम लागू

जगभरात कोरोनाचं संकट (Covid 19) पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच आता फ्रान्स सरकारने कोरोना पासची व्यवस्था लागू केली आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचं संकट (Covid 19) पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच आता फ्रान्स सरकारने कोरोना पासची व्यवस्था लागू केली आहे. याअंतर्गत लस घेणाऱ्या नागरिकांना पास देण्यात येणार आहे. पास असणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एंट्री मिळणार आहे. कोविड पास केवळ वयस्कर नागरिकांना लागू असणार आहे. 30 सप्टेंबर पासून 12 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना हा नियम लागू होणार आहे. या नव्या कोरोना नियमावलीच्या विरोधात फ्रान्समधील जनता रस्त्यावर उतरली आहे. या दरम्यानच फ्रान्सच्या (France) संसदेत याला मंजूरी देण्यात आली आहे. देशातील नागरिकांनी या नवा नियमाला नागरी स्वातंत्र्याचं उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्युनल मॅक्रॉन (Immune Macron) यांनी मागील आठवड्यामध्ये आदेश काढला होता, ज्या नागरिकांकडे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आहे त्यांनाच फ्रान्समधील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाता येणार आहे. तसेच नाइट क्लब, रेल्वे आणि हवाई सफर करण्यासाठीही लागू करण्यात येणार आहे. हा हेल्थ पास डिजिटल स्वरुपामध्ये असणार आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्युन्यल मॅक्रॉन यांच्या मतानुसार, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक पाऊले उचलणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी आणि देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपल्या नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. नव्या कायद्यानुसार आरोग्याची समस्या रोखण्यासाठी देशातील आरोग्य कर्माचाऱ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. असं न करणाऱ्याला निलंबित करण्यात येऊ शकते.

इमॅन्युल मॅक्रॉन यांनी रविवारी देशभरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्रित सहभागी करुन आणि या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र लसीकरणाला विरोध करणाऱ्यांची आणि त्याविरोधात अफवा पसरवण्याऱ्यांची कठोर आलोचना केली आहे. प्रदर्शकारींनी स्वतंत्र्यांचा जयघोष करत म्हटले की, मॅक्रॉन सरकारने आम्हाला कोणत्याही गोष्टी शिकवू नये की, आम्ही काय करावे ते. दरम्यान फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी फ्रेंच पोलिनेशिया स्थित रुग्णालयाचा दौरा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cipla Share Price: सिप्लाच्या गोव्यातील प्लांटला Good Tag; कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ

Diwali 2024: उधळण आनंदाची! तेजोमय दिव्यांना बहरलेला 'दिपोत्सव'

Goa Monsoon 2024: पेडणे, सत्तरी, डिचोलीत ढगाळ वातावरण; तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता

VIDEO: धक्कादायक! मोकाट कुत्र्याच्या शेपटीला बांधून तरुणाने फोडले फटाके; व्हिडिओ व्हायरल

Suyash Prabhudesai: पायाच्या दुखापतीनं केला घात! मिझोरामविरुद्धच्या सामन्याला गोव्याचा स्टार मुकणार

SCROLL FOR NEXT