President of France Emmanuel Macron Dainik Gomantak
ग्लोबल

Abortion Constitutional Right: गर्भपाताच्या अधिकाराला फ्रान्स देणार कायदेशीर मान्यता! असे करणारा ठरणार पहिला देश

France To Make Abortion Constitutional Right: फ्रान्स गर्भपाताच्या अधिकाराला कायदेशीर मान्यता देणार आहे. फ्रान्सचे खासदार याबाबत निर्णय घेतील.

Manish Jadhav

France To Make Abortion Constitutional Right: फ्रान्स गर्भपाताच्या अधिकाराला कायदेशीर मान्यता देणार आहे. फ्रान्सचे खासदार याबाबत निर्णय घेतील. ही कायदेशीर मान्यता मिळाल्यास फ्रान्स असे करणारा जगातील पहिला देश ठरेल. त्यासाठी काँग्रेसला संसदेच्या दोन्ही सभागृहात 3:5 या प्रमाणात बहुमताची आवश्यकता असेल. काँग्रेसकडून परवानगी मिळाल्यास, गर्भपाताच्या अधिकाराचा मूलभूत कायद्यात समावेश करणारा तो जगातील पहिला देश बनेल.

अध्यक्ष मॅक्रॉन यांनी गेल्या वर्षी आश्वासन दिले होते

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी गेल्या वर्षी हा अधिकार घटनेचा भाग बनवण्याचे आश्वासन दिले होते. फ्रान्समध्ये 1975 पासून ते कायदेशीर आहे. 2022 मध्ये, यूएस सर्वोच्च न्यायालयाने हा जवळपास अर्धा दशक जुना अधिकार रद्द केला आणि देशांना त्यावर बंदी घालण्याची परवानगी दिली. या निर्णयानंतरच मॅक्रॉन यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. जानेवारीमध्ये नॅशनल असेंब्लीच्या कनिष्ठ सभागृहाने गर्भपाताच्या स्वातंत्र्याची हमी संविधानात समाविष्ट करण्यास बहुमताने परवानगी दिली होती.

1975 मध्ये याला कायदेशीर मान्यता मिळाली

सेंटर फॉर रिप्रॉडक्टिव्ह राइट्सच्या लिया हॉक्टर यांनी सांगितले की, फ्रान्स केवळ युरोपमध्येच नव्हे तर संपूर्ण जगात अधिक विस्तृत आणि सर्वसमावेशक अधिकाराची तरतूद करुन आदर्श घालून देईल. अलीकडेच या विधेयकावर सिनेटमध्ये झालेल्या मतदानादरम्यान त्याच्या बाजूने 267 मते पडली तर विरोधात फक्त 50 मते पडली. फ्रान्समध्ये (France) 1975 मध्ये गर्भपाताला कायदेशीर मान्यता देण्यात आली होती. पूर्वी त्याचा वैधता कालावधी गर्भधारणेच्या पहिल्या 10 आठवड्यांपर्यंत होता. पण, नंतर त्याचा कालावधी 14 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आला.

देशातील 96 टक्के जनतेचे समर्थन आहे

वृत्तानुसार, फ्रेंच संसदेतील बहुतेक सदस्य या कायद्याअंतर्गत अतिरिक्त सुरक्षा देण्याच्या समर्थनात आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले होते की, येथील 86 टक्के लोक या निर्णयाचे समर्थन करत आहेत. डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी या बदलाचे स्वागत केले, परंतु उजव्या विचारसरणीच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, ग्रीन सिग्नल देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे. गेल्या बुधवारी फ्रेंच सिनेटमध्येही या विधेयकाला पूर्ण पाठिंबा मिळाला. अध्यक्ष मॅक्रॉन यांनी सिनेटमधून मिळालेल्या प्रतिसादाला निर्णायक पाऊल म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT