Suleiman Al-Obaid Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Israel-Hamas War Sulaiman Al obaid Death: पॅलेस्टाईन राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार सुलेमान अहमद जैद अल-ओबैदचे वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झाले.

Sameer Amunekar

पॅलेस्टाईन राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार सुलेमान अहमद जैद अल-ओबैदचे वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झाले. वृत्तानुसार, गाझा येथे इस्रायली हल्ल्यात हा पॅलेस्टिनी स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू झाला. पॅलेस्टाईनमध्ये इस्रायली हल्ले सुरूच आहेत. पॅलेस्टाईन फुटबॉल असोसिएशनने (पीएफए) जैद अल-ओबैदच्या मृत्यूची माहिती दिलीय.

सुलेमान अल-ओबेदला 'पॅलेस्टिनी पेले' म्हणून ओळखलं जात होतं. पीएफएनुसार, गाझाच्या खादमत अल-शाती क्लबचा माजी स्टार फुटबॉलपटू सुलेमान अल-ओबैदने पॅलेस्टाइनसाठी २४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सुलेमान अल-ओबेद यांनी त्यांच्या कारकिर्दीत १०० हून अधिक गोल केले, ज्यामुळे ते पॅलेस्टिनी फुटबॉलमधील सर्वात तेजस्वी ताऱ्यांपैकी एक बनले.

सुलेमान अल-ओबैद हा पॅलेस्टिनी फुटबॉल विश्वातील एक लोकप्रिय आणि आदरणीय खेळाडू मानला जात होता. १९६७ पासून इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँक अल-अमारी युथ सेंटर क्लबकडून त्याने अनेक वर्षे खेळ केला होता. मैदानावर त्याची उत्कृष्ट कौशल्ये, संघभावना आणि लढाऊ वृत्ती यामुळे तो पॅलेस्टिनी चाहत्यांचा आवडता बनला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे गाझा युद्ध सुरु झाल्यापासून आतापर्यंत क्रीडा क्षेत्रातील तब्बल ६६२ लोक मरण पावले आहेत.

तर फुटबॉल खेळाशी संबंधित ३२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच, इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये गाझातील किमान ६१,२५८ लोक मारले गेल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: सारवी, कविता, दिनाज, जास्मिन... चौघींच्या प्रेमात 80 वर्षीय मुंबईकर कंगाल, 9 कोटींना घातला गंडा

Viral Video: अजब फॅशन! महिलेने जिवंत बेडकाचे बनवले 'नेकलेस', व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण; तुम्ही पाहिलाय का?

IND vs AUS: भारताचा 'क्लीन स्वीप'! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात शेफालीची खेळी ठरली व्यर्थ; कांगारुंनी मारली बाजी

Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या क्रूर कृत्याने हादरले उत्तराखंड

Goa Politics: "गोव्यात एकाच घरात 80 मतदार; आता सरकारचा पर्दाफाश करू" काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT