Roshan Mahanama Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: माजी क्रिकेटपटूचा मदतीचा हात पुढे, देशवासीयांना दिला 'हा' सल्ला

श्रीलंकेतील आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. लोक अन्नाच्या एका एका घासासाठी तसकत आहेत. तेलाच्या संकटामुळे लोकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. यादरम्यान, श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू रोशन महानामाने आपल्या देशवासीयांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. (Former cricketer Roshan Mahanama Are helping the people of Sri Lanka)

माजी क्रिकेटपटू पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगेत उभ्या असलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदत करत असल्याचे दिसून येत आहे. माजी क्रिकेटपटूही पेट्रोल पंपावर लोकांना चहा देताना दिसला आहे. यासह त्यांनी लोकांना आवाहन केले आणि सांगितले की लोकांनी कठीण काळात आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी.

श्रीलंकेतील इंधनाच्या संकटाच्या वेळी, माजी क्रिकेटपटू रोशन महानामा (Roshan Mahanama) इंधन आणि स्वयंपाकाचा गॅस खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांगेत उभे असलेल्या लोकांना चहा आणि बन देताना दिसून आले आहेत. 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज श्रीलंकेची परिस्थिती अशी आहे की लोकांना अन्न, औषध आणि इंधनाची तीव्र टंचाई भासत आहे.

आर्थिक संकटात माजी क्रिकेटपटू चहा देताना दिसला

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू रोशन महानामा यांनी स्वतः ट्विट केले आहे की, "आम्ही वॉर्ड प्लेस आणि विजेरामा मावाथाभोवती पेट्रोलच्या रांगेत असलेल्या लोकांना सामुदायिक जेवणासह चहा आणि बन्स दिले आहेत.

रांगा दिवसेंदिवस लांबत चालल्या असून रांगेत असणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूने लोकांना एकमेकांची काळजी घेण्याचे आवाहन केले आणि तासनतास रांगेत उभे असताना पुरेसे अन्न साठा सोबत ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

कठीण प्रसंगी एकमेकांना मदत करण्याचे केले आवाहन

इंधन गोळा करण्यासाठी रांगेत उभे असताना लोकांना एकमेकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरेसे अन्न सोबत ठेवा आणि जर तुमची प्रकृती ठीक नसेल, तर कृपया तुमच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधा आणि मदतीसाठी विचारा किंवा 1990 वर कॉल करा.

या कठीण काळात आपण एकमेकांची काळजी घ्यायला हवी. यावर्षी मार्च महिन्यापासून सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला अन्न, औषध, स्वयंपाकाचा गॅस आणि इतर इंधन, टॉयलेट पेपर आणि अगदी मॅच बॉक्स यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.

श्रीलंकेत विजेचे संकट गंभीर झाले

श्रीलंका सरकारने शनिवारी वीज कपातीमुळे येत्या आठवडाभर सर्व शाळा आणि संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. श्रीलंकेच्या शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी ऑनलाइन वर्ग आयोजित करण्याचा सल्ला दिला आहे.

श्रीलंकेच्या आर्थिक संकटाचा विशेषतः अन्न सुरक्षा, शेती, उपजीविका आणि आरोग्य सेवांवरती परिणाम झाला आहे. गेल्या हंगामातील अन्नधान्य उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत 40-50 टक्क्यांनी कमी झाले आहे. सध्या बी-बियाणे, खते, इंधनची तीव्र टंचाई आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT