Elon Musk Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk: 'या' कारणामुळे मस्क यांनी दिला ट्विटरच्या 50 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ

ज्या कर्मचाऱ्यांना काढले त्यांना दिला तीन महिन्यांचा पगार

गोमन्तक डिजिटल टीम

Elon Musk: एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीच्या जगभरातील कर्मचाऱ्यांची कपात सुरू केली आहे. कंपनीच्या एकूण 7,500 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांना मस्क यांनी नारळ दिला आहे. यात भारतातील 200 हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (Twitter layoffs)

कंपनीच्या इंजीनियरिंग, सेल्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभागातील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत आहे. ट्विटर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून हटविल्याचे ई-मेल्स आले आहेत. या आधी गुरूवारी कंपनीने इमेलद्वारे कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी न येण्यास सांगितले होते. या मेलमध्ये म्हटले होते की, जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा ऑफिसमध्ये येण्यासाठी रस्त्यात असाल तर परत घरी जा.

मस्क यांनी याबाबत स्पष्टीकरण देणारे ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आङे की, कंपनीला दररोज 40 लाख डॉलर (32.77 कोटी रूपये) नुकसान होत आहे. त्यामुळे आमच्याकडे कर्मचारी कपात करण्याशिवाय पर्याच राहिलेला नाही. ज्यांना काढले गेले आहे, त्यांना 3 महिने सेव्हरन्स दिला गेला आहे. कायदेशीरदृष्ट्या दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा ही रक्कम 50 टक्के जास्त आहे.

भारतात ट्विटरच्या कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख पल्लवी वालिया यांनी त्यांना काढून टाकल्याची माहिती दिली आहे. अशा इतरही अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीने काढले आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी आनंदाने ही कपात स्विकारली आहे.

कर्मचाऱ्यांना तीन प्रकारचे मेल...

कर्मचाऱ्यांना तीन प्रकारचे ईमेल्स पाठवले गेले आहेत. त्यापैकी एक ईमेल ज्या कर्मचाऱ्यांना काढण्यात आलेले नाही, त्यांना पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने तुमच्या कामावर परिणाम होणार नाही. एक मेल ज्यांना कामावरून काढले आहे, त्यांना पाठवला आहे. तर ज्या कर्मचाऱ्यांबाबत अद्याप काहीही निर्णय घेतला गेलेला नाही, त्यांनाही एक मेल पाठवला गेला आहे. त्यात म्हटले आहे की, ट्विटरसाठी तुमची भूमिका किती महत्वाची आहे, तुम्ही कोणत्या देशात आहात, यावरून तुमच्याबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान, सॅन फ्रान्सिस्को येथील फेडरल कोर्टात या कर्मचारी कपातीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT