Kevin McCarthy|US House Speaker Dainik Gomantak
ग्लोबल

Kevin McCarthy: 234 वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार, अमेरिकन संसदेचे स्पीकर मॅकार्थी यांची हकालपट्टी

Kevin McCarthy: 234 वर्षांच्या इतिहासात प्रथमच, अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष पदावरुन हाकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ashutosh Masgaunde

For the first time in the 234-year history of the US Parliament, Speaker of the US Parliament Kevin McCarthy was impeached:

रिपब्लिकन पक्षाचे खासदार केविन मॅकार्थी यांना यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. अमेरिकन संसदेच्या काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह, प्रतिनिधीगृहाने मंगळवारी मॅकार्थी यांना स्पीकर पदावरून हटवण्याच्या बाजूने मतदान केले.

अमेरिकेच्या संसदीय इतिहासाच्या 234 वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारचे मतदान झाले आहे. त्याचबरोबर मतदानाद्वारे पदावरून हटवलेले मॅककार्थी (Kevin McCarthy) हे पहिले अध्यक्ष ठरले आहेत.

मॅककार्थी यांनी एकूण 269 दिवस हाऊस स्पीकर म्हणून काम केले, जो यूएस इतिहासातील कोणत्याही स्पीकरचा दुसरा सर्वात लहान कार्यकाळ होता.

मॅककार्थी (Kevin McCarthy) यांची 7 जानेवारी 2023 रोजी स्पीकर म्हणून निवड झाली आणि मंगळवारी त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.

सभागृहाला आता नवीन स्पीकरची निवड करावी लागणार आहे. पण कोणत्याही पक्षाला जिंकण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक मते नाहीत.

अमेरिकेतील शटडाऊन टाळण्यासाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निधी विधेयक मंजूर करून घेण्यात मॅकार्थी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कारवाईमुळे रिपब्लिकन खासदार संतप्त झाले.

या कारणास्तव त्यांनी मॅकार्थी (Kevin McCarthy) यांना स्पीकर पदावरून हटवण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले. रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधीगृहात बहुमत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मॅकार्थी यांना हटवण्यासाठी आणलेला प्रस्ताव सभागृहात 216-210 मतांच्या फरकाने मंजूर करण्यात आला.

यावेळी सात रिपब्लिकन खासदारांनी मॅककार्थी यांना पदावरून हटवण्याच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले. यामध्ये अँडी बिग्स, केन बक, टिम बर्चेट, एली क्रेन, मॅट गेट्झ, बॉब गुड, नॅन्सी मेस आणि मॅट रोसेंडेल यांचा समावेश आहे.

याशिवाय, सर्व हाऊस डेमोक्रॅट्सने मॅकार्थी (Kevin McCarthy) यांना हटवण्यासाठी मतदान केले. तथापि, मॅकार्थी यांनी डेमोक्रॅटिक खासदारांना त्यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले होते.

केविन मॅकार्थी यांच्याबद्दल थोडक्यात...

केविन मॅककार्थी नऊ वेळा अमेरिकन संसदेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. मॅककार्थीचा जन्म बेकर्सफील्ड, कॅलिफोर्निया येथे झाला.

मॅककार्थी यांनी अग्निशामक जवान म्हणून काम करत असताना 1989 मध्ये कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी बेकर्सफील्डमधून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी याच विद्यापीठातून 1994 मध्ये व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतली.

पोस्ट ग्रॅज्युएशनच्या काळातच ते रिपब्लिकन काँग्रेसचे बिल थॉमस यांच्याशी जोडले गेले. प्रथम त्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर तो त्यांच्या स्टाफचे सदस्य झाले. आणि आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला.

गेल्या निवडणुकीनंतर अमेरिकन संसदेने रिपब्लिकन पक्षाचे केविन मॅकार्थी यांची प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षपदी निवड केली होती. मॅककार्थी (Kevin McCarthy) हे यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे 55 वे स्पीकर होते. 57 वर्षीय केविन मॅकार्थी यांनी प्रतिनिधीगृहात डेमोक्रॅटिक पक्षाच्या 82 वर्षीय नेत्या नॅन्सी पेलोसी यांची जागा घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT