43 people died in a fire in a hotel in Bangladesh 
ग्लोबल

Bangladesh Fire Viral Video: हॉटेलला लागलेल्या आगीत ४३ जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारी दृष्ये

Ashutosh Masgaunde

43 people died in a fire in a hotel in Bangladesh:

बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. यादरम्यान राजधानी ढाकामधील एका सात मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत ४३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत.

बांगलादेशचे आरोग्य मंत्री सामंत लाल सेन यांनी ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि जवळच्या बर्न्स हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर सांगितले की, आगीत आतापर्यंत 43 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 40 जखमींना शहरातील मुख्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

अग्निशमन दलाचे अधिकारी मोहम्मद शिहाब यांनी सांगितले की, ढाक्यातील बेली रोडवरील लोकप्रिय बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली. ही आग रात्री 9.50 च्या सुमारास लागली. त्यानंतर काही वेळातच आग इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पसरली. यानंतर लोक इमारतीत अडकले.

त्यांनी पुढे सांगितले की, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. दोन तासांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला असून 75 जणांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

आरोग्य मंत्री सामंत लाल यांच्या म्हणण्यानुसार, ढाक्याच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 33 जणांचा मृत्यू झाला, तर शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न आणि प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटलमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला.

अनेक मृतदेह जळाले असून त्यांची ओळख पटवणे कठीण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, पहिल्या इमारतीला आग लागल्यानंतर लोक घाबरून वरच्या मजल्याकडे धावू लागले. मात्र, आग वरच्या मजल्यापर्यंत पसरली तेव्हा लोकांकडे पळून जाण्याचा पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी पायऱ्यांचा वापर करून लोकांना सुखरूप बाहेर काढले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत नाराज, गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरल्यावरुन व्यक्त केली चिंता

Goa Today's News Live: अवजड वाहनांना अनमोड घाट खुला

Sahara Refund Cap: सहारामध्ये पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांना दिलासा, रिफंडबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

SCROLL FOR NEXT