Finland's Prime Minister Sana Marin Dainik Gomantak
ग्लोबल

Video: फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन यांचा पार्टीत दारु पिऊन डान्स

Finland's Prime Minister Sana Marin: फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा एक व्हिडिओ लीक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला आहे.

दैनिक गोमन्तक

Finland's Prime Minister Sana Marin: फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा एक व्हिडिओ लीक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला आहे. व्हिडिओमध्ये त्या दारु पिऊन मैत्रिणींसोबत डान्स करताना दिसत आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी सना मरीन यांनी मैत्रिणींसोबत ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप केला. विरोधक आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे, सना मरिन यांनी कबूल केले की, 'मी मैत्रिणींसोबत मद्यपान केले होते, परंतु ड्रग्ज घेण्याच्या अफवा आहेत. मी ड्रग्ज चाचणीसाठी तयार असल्याचे आव्हान फेटाळून लावते.'

दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये फिनलंडच्या पीएम सना मरीन मैत्रिणींसोबत मद्यपान करुन डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर लोक पंतप्रधानांच्या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. काहीजण अशा प्रकारच्या घटना सामान्य असल्याचे म्हणत आहेत, तर काहीजण सना मरीन फिनलंडच्या (Finland) पंतप्रधानपदासाठी योग्य नाहीत असे म्हणत आहेत.

दुसरीकडे, फिनलंडच्या स्पोर्ट्स टॉक शोचे होस्ट अ‍ॅलेक्सी वल्लावुरी यांनी मरीन यांना देशातील सर्वात अक्षम पंतप्रधान म्हटले आहे. कृपया तुम्ही तात्काळ राजीनामा द्या, असेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

तसेच, फिनलंडचे प्रतिष्ठित वृत्तपत्र इल्तालेहतीनुसार, व्हिडिओमध्ये मरीन या मैत्रिणीसोबत डान्स करताना दिसत आहेत. फिनिश रॅपर पेट्री नायगार्ड आणि पॉप गायक अँटी तुइस्कू यांच्या गाण्यांवर त्या डान्स करत आहे.

मी ड्रग टेस्टसाठी तयार आहे: सना मरीन

त्यांनी ज्या पार्टीला हजेरी लावली त्यात ड्रग्जचा वापर झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर पंतप्रधान सना मरिन यांनी सांगितले की, ''आवश्यक असल्यास मी ड्रग्ज टेस्टसाठी तयार आहे. माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही. मी कधीही ड्रग्ज घेतलेले नाही,"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

Weather Update: धारबांदोडा, वाळपई, सांगेत पावसाची नव्‍वदी पार; सरासरीतील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिकच

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, थकबाकीची रक्कमही मिळणार

Trigrahi Yog 2026: 22 ऑगस्टला बनतोय सर्वात शक्तिशाली 'त्रिग्रही योग'! 4 राशींच्या पदरात पडणार श्रीमंती अन् यश; भाग्योदयाचे दिवस सुरु होणार

SCROLL FOR NEXT