रशियाने दिली फिनलंड-स्वीडनला उघड धमकी, 'नाटोचा तळ बांधल्यास...'

रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे.
Vladimir Putin
Vladimir PutinDainik Gomantak

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम झालेला दिसून येत आहे. त्याचबरोबर अनेक देशांच्या चलनामध्ये मोठी घसरणही झालेली पाहायला मिळत आहे.

Vladimir Putin
Russia-Ukraine War: भारतीय दूतावास पुन्हा होणार कार्यरत

दरम्यान, रशियाने नाटो देशांना 'अण्वस्त्र हल्ला' करण्याची धमकी दिली आहे. खरंतर, रशियाने म्हटले आहे की, फिनलंड किंवा स्वीडनमध्ये नाटोने लष्करी तळ बांधल्यास आम्ही अण्वस्त्रे तैनात करु. फिनलंडचे (Finland) राष्ट्राध्यक्ष सौली निनिस्टो यांनी रविवारी सांगितले होते की, आमचा देश नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज करेल. याकडे ऐतिहासिक धोरणाची परिपूर्णता म्हणून पाहिले जात आहे, त्यामागे युक्रेनविरुद्धचे युद्ध आहे. बीबीसीच्या मते, स्वीडन (Sweden) आणि फिनलंड नाटोमध्ये सामील झाल्याच्या वृत्तावर रशियाच्या सरकारी टीव्हीने म्हटले आहे की, 'त्यांनी असे करणे भीतीदायक आहे. परंतु ते नाटोमध्ये सामील झाल्यास आम्ही अण्वस्त्रे तैनात करु.'

रशियाच्या सरकारी माध्यमाने पुढे सांगितले की, 'स्वीडन आणि फिनलंडमध्ये जेव्हा नाटोचे तळ दिसतील. तेव्हा रशिया अण्वस्त्रे तैनात करुन आपली ताकद दाखवेल.' रशियाची 1300 किमी लांबीची सीमा फिनलँडशी आहे. अशा परिस्थितीत फिनलंडने नाटोमध्ये सामील होणे ही मोठी चूक असेल, कारण त्यामुळे द्विपक्षीय संबंध बिघडतील, असे रशियाने म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, 'या निर्णयामुळे रशिया-फिनलंड संबंध बिघडू शकतात.' फिनलंडनंतर स्वीडनचेही नाटोमध्ये सामील होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

स्वीडन आणि फिनलंड नाटोमध्ये सामील जवळपास निश्चित

नॉर्डिक देश फिनलंड आणि स्वीडन नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) चे सदस्य होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. युक्रेनवर (Ukraine) रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यादरम्यान फिनलंड सरकारने रविवारी उघडपणे नाटोचे सदस्य होण्याचा आपला इरादा जाहीर केला. काही तासांनंतर, स्वीडनच्या सत्ताधारी पक्षानेही नाटो सदस्यत्वाच्या योजनेला पाठिंबा दिला. आपल्या सीमेजवळ नाटोच्या दृष्टिकोनावर रशियाची भूमिका बऱ्याच काळापासून विरोधाची राहीली आहे. अशा स्थितीत ताज्या घडामोडींमुळे मॉस्को आणखी संतप्त होणार हे नक्की.

Vladimir Putin
Russia-Ukraine War: भारतीय दूतावास पुन्हा होणार कार्यरत

याशिवाय, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी रविवारी बर्लिनमध्ये 30 नाटो सहयोगी सदस्य देशांच्या शीर्ष राजनैतिक अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सांगितले की, 'फिनलंड आणि स्वीडनची नाटोमध्ये सामील होण्याची प्रक्रिया त्वरीत पूर्ण केली जाईल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com