Finland Join NATO Dainik Gomantak
ग्लोबल

Finland Join NATO: फिनलॅंड बनला नाटो संघटनेचा 31 वा सदस्य, रशियाची वाढली चिंता

Finland Join NATO: फिनलॅंड मंगळवारी (4 एप्रिल) नाटोचा 31 वा सदस्य बनला आहे. रशियाविरोधात अमेरिकेची मोठी राजकीय खेळी म्हणून याकडे पाहिले जात आहे.

Manish Jadhav

Finland Join NATO: फिनलॅंड मंगळवारी (4 एप्रिल) नाटोचा 31 वा सदस्य बनला आहे. रशियाविरोधात अमेरिकेची मोठी राजकीय खेळी म्हणून याकडे पाहिले जात आहे. फिनलॅंड हा रशियाचा शेजारी देश आहे. फिनलॅंडची रशियाशी 1300 किलोमीटरची सीमा आहे.

दरम्यान, फिनलॅंड (Finland) नाटोमध्ये सामील झाल्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युतीची ताकद दुप्पट झाली आहे.

गेल्या आठवड्यात, NATO सहयोगी तुर्की आणि हंगेरी यांनी NATO मध्ये सामील होण्यासाठी फिनलॅंडला मतदान केले. ही प्रक्रिया एका वर्षात पूर्ण झाली, जी अलीकडच्या इतिहासातील सर्वात कमी वेळेतील सर्वात जलद सदस्यत्व प्रक्रिया असल्याचे मानले जाते.

सदस्यत्वाशी संबंधित उर्वरित औपचारिकता पूर्ण करेल

नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी फिनलॅंडच्या नाटोमध्ये सामील झाल्याबद्दल सांगितले की, हा खरोखर एक ऐतिहासिक दिवस आहे. संघटनेसाठी हा दिवस आनंदाचा आहे.

दुसरीकडे, फिनलॅंडचे राष्ट्राध्यक्ष साऊली निनिस्टो आज ब्रुसेल्सला जाणार असून नाटो सदस्यत्वाशी संबंधित उर्वरित औपचारिकता पूर्ण करणार आहेत.

दरम्यान, फिनलॅंडचे परराष्ट्र मंत्री नाटोच्या स्थापना कराराचे संरक्षक अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांना औपचारिक प्रवेश पत्र सुपूर्द करतील.

त्याचवेळी, ब्रुसेल्समधील नाटो मुख्यालयासमोर, देशाचा निळा आणि पांढरा ध्वज त्यांच्या नवीन मित्र राष्ट्रांच्या पुढे फडकवला जाईल.

फिनलॅंडला रशियाच्या हल्ल्याची भीती वाटत होती

रशियाने (Russia) युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे फिनलॅंड घाबरला होता. वास्तविक, युक्रेन हा नाटो देशाचा सदस्य नाही. त्यामुळे नाटो युक्रेनला मदत करु शकला नाही. हे पाहता फिनलॅंडने नाटो गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्याला भीती होती की, भविष्यात रशिया आपल्यावर हल्ला करु शकतो.

यावर, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी सांगितले की, रशियाचे अध्यक्ष पुतिन हे युक्रेनवर हल्ला करुन नाटोला दडपण्याचा प्रयत्न करत होते, मात्र फिनलॅंड सामील झाल्यानंतर त्यांचा निर्णय उलटला.

दुसरीकडे, स्वीडन देखील नाटोमध्ये सामील होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, परंतु तुर्कीच्या हस्तक्षेपामुळे ते शक्य होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT