FIFA World Cup 2022 Dainik Gomantak
ग्लोबल

FIFA World Cup 2022 पाहण्यासाठी 5 मुलांच्या आईचा थेट महिंद्रा थारमधून केरळ ते कतार प्रवास

दैनिक गोमन्तक

FIFA World Cup 2022: सध्या सुरु असलेल्या फिफा विश्वचषकात (FIFA) नुकतेच एका महिलेने अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण ही महिला लिओनेल मेस्सीची मोठी फॅन आहे. त्याची एक झलक पाहाण्यासाठी तिने जे केले ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

फुटबॉलची (Football) क्रेझ क्रिकेटपेक्षाही अधिक आहे. जगभरात फुटबॉलचे करोडो चाहते आहेत. जे सध्या फिफा वर्ल्ड कप 2022 पाहाण्यासाठी यजमान कतारमध्ये दाखल झाले आहेत. भारतातही (India) 9 फुटबॉलचे त्यातले स्टार मेस्सी, रोनाल्डो, नेयमार अशा स्टार खेळाडूंचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. भारतात यंदाचा फुटबॉल वर्ल्ड कप कोण जिंकणार याबद्दल बेटही लागल्या आहेत. भारतातही बायचुंग भुतीया आणि सुनील छेत्रीसारखे जागतिक दर्जाचे खेळाडू घडताना पाहायला मिळू लागले आहेत.

यंदा एका महिलेने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण ही महिला लिओनेल मेस्सीची प्रचंड चाहती आहे. त्याची एक झलक पाहाण्यासाठी तिने जे केले ते ऐकून तुम्हाला तोंडात बोटे घालायला लावेल. विशेष म्हणजे ही महिला भारतीय आहे. पाच मुलांची आई असलेल्या या महिलेने चक्क केरळ ते कतार असा प्रवास केला आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात विशेष असे काय? पण हा प्रवास तिने केरळहून आपल्या आवडत्या महिंद्रा थारमधून (Mahindra Thar) सुरू केला आणि मेस्सीला पाहाण्यासाठी ती थेट थारने कतारला (Qatar) पोहोचली.

एका वृत्ताच्या अहवालानुसार, पाच मुलांची आई असलेल्या नाजी नौशीने 15 ऑक्टोबरला केरळमधून (Kerala) आखाती देशांमध्ये प्रवास सुरू केला. तसेच संयुक्त अरब अमिराती गाठली. 33 वर्षीय नौशीला तिचा 'हिरो' मेस्सी आणि अर्जेंटिनाला वर्ल्ड कपमध्ये खेळताना पाहायचे होते. पण, अर्जेंटिना सलामीच्याच सामन्यात सौदी अरेबियाकडून पराभूत झाल्याने नाजी काहीशी निराश झाली आहे. असे असले तरी पुढच्या सामन्यापासून सारं काही सुरळीत होईल अशी तिला आशा आहे.

वृत्तपत्राने नाजीच्या मुलाखतीचा हवाला देत म्हटले आहे की, "मला माझा 'हीरो' लिओनेल मेस्सी खेळताना बघायचे आहे. सौदी अरेबियाकडून झालेला पराभव माझ्यासाठी निराशाजनक होता पण मला खात्री आहे की ट्रॉफी जिंकण्याच्या मार्गात तो किरकोळ अडथळा ठरेल.

नौशीने प्रथम तिची 'SUV' मुंबईहून (Mumbai) ओमानला पाठवली आणि योगायोगाने उजव्या हाताच्या स्टीयरिंगसह देशात पाठवलेली ही पहिली भारतीय नोंदणीकृत कार आहे. तिने मस्कत येथून प्रवास सुरू केला आणि हटा बॉर्डरवरून ती एसयूव्हीमध्ये यूएईला पोहोचली. यादरम्यान ती दुबईतील (Dubai) जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा (Burj Khalifa) पाहण्यासाठी थांबली. या एसयूव्हीमध्ये घरातील 'स्वयंपाकघर' आणि छताला तंबू जोडलेला आहे

नोजीने कारचे नाव 'ओलू' ठेवले आहे, ज्याचा मल्याळममध्ये 'ती' असा अर्थ होतो. नोजीने तांदूळ, पाणी, मैदा, मसाले आणि इतर सुक्या गोष्टी गाडीत ठेवल्या होत्या. फूड पॉयझनिंगपासून बचाव करण्यासाठी आपण किचनच आपल्या सोबत ठेवल्याचे नोजी म्हणते. सध्या नोजी सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT