FIA International Womens Day 2026 Dainik Gomantak
ग्लोबल

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

International Women's Day: अमेरिकेतील विविध व्यावसायिक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या भारतीय वंशाच्या महिला नेत्यांचा आणि मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला.

Manish Jadhav

International Women's Day 2026: फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन (FIA) NY-NJ-CT-NE या संस्थेच्या वतीने 6 मार्च 2026 रोजी 'इंडिया हाऊस' येथे 8व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे शानदार आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या माध्यमातून अमेरिकेतील विविध व्यावसायिक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या भारतीय वंशाच्या महिला नेत्यांचा आणि मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला. समाजकारण, व्यापार, वित्त आणि माध्यम क्षेत्रातील महिलांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समुदायातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात रिद्धी पारिख पटेल यांनी केली. यावेळी मागील वर्षीच्या पुरस्कार विजेत्या राधा सुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. 1 जानेवारी 2026 रोजी पदभार स्वीकारलेले FIA चे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांत अक्कापल्ली यांनी उपस्थितांना संबोधित करताना महिला सक्षमीकरणासाठी संस्थेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी समाजातील सकारात्मक बदलांसाठी महिलांच्या (Womens) भूमिकेचे कौतुक केले आणि एफआयएचे अध्यक्ष अंकुर वैद्य, विश्वस्त आणि कार्यकारी समितीच्या वतीने सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

या सोहळ्यात न्यू यॉर्कमधील भारताचे (India) महावाणिज्य दूत विनय श्रीकांत प्रधान यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. भारताच्या विकासामध्ये महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' आणि 'उज्ज्वला योजना' यांसारख्या केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनांचा उल्लेख केला. या योजनांमुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला आणि महिलांच्या आरोग्याला मोठी चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासात पत्नीने दिलेल्या खंबीर साथीबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गौरविण्यात आलेल्या सर्व महिलांना न्यू यॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांच्याकडून प्राप्त झालेली प्रमाणपत्रे, एफआयएचे मानाचे सॅश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या नामवंत महिलांनी आपले अनुभवही शेअर केले. प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शेट्टी यांनी मातृत्व आणि आपली सांस्कृतिक ओळख यावर भाष्य केले, तर न्यूयॉर्क पोलीस विभागातील तानिया किन्सेला यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबातील कणखर महिलांना समर्पित केला. डॉक्टर बालप्रीत ग्रेवाल-विर्क यांनी स्थलांतरित कुटुंबांचा संघर्ष आणि त्यांना मिळणारा आप्तस्वकीयांचा पाठिंबा यावर विचार मांडले. कार्यक्रमाचा समारोप एफआयएच्या सरचिटणीस सृष्टी कौल नरुला यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. 1970 मध्ये स्थापन झाल्यापासून एफआयए ही संस्था सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासोबतच अमेरिकेच्या उत्तर-पूर्व भागात राहणाऱ्या भारतीय समुदायाला एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT