Women MP Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Protests: खचाखच भरलेल्या संसदेत महिला खासदाराने कापले केस, Video Viral

Iran Protests Video: महिलांच्या पेहराव आणि कपड्यांबाबत इराणमध्ये सुरु असलेल्या निदर्शनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमन्तक

Iran Protests Video: महिलांच्या पेहराव आणि कपड्यांबाबत इराणमध्ये सुरु असलेल्या निदर्शनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. बहुतेक देश इराणी महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. या आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक महिलांची हत्याही करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी एक महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर देशात सुरु असलेल्या निदर्शनांदरम्यान युरोपियन संसद सदस्याने इराणी महिलांना पाठिंबा दिला आहे. संसदेत चर्चेदरम्यान त्यांनी केस कापले.

महिला खासदाराने केस कापण्यास सुरुवात केली

स्ट्रासबर्ग येथे EU चर्चेला संबोधित करताना, स्वीडिश नेत्या अबीर अल सहलानी म्हणाल्या की, 'इराणमध्ये (Iran) महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचा आम्ही निषेध करतो. आम्ही इराणी महिलांच्या पाठिशी आहोत.' त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये, अल सहलानी युरोपियन संसदेच्या (Parliament) सदस्यांसमोर कात्रीने केस कापताना दिसत आहेत.

इराणमध्ये तीव्र निषेध

नॉर्वे स्थित ग्रुप इराण ह्युमन राइट्स (IHR) NGO च्या म्हणण्यानुसार, महसा अमिनी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ देशभरात 100 हून अधिक लोक मारले गेले आहेत. इराणच्या शाळकरी मुली आणि महिलांनी अमिनी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ हिजाब काढून रॅली काढली. अनेक महिलांनी (Women) सरकारविरोधी घोषणाबाजी करताना केस कापले. युरोपियन संसदेचे सदस्य अबीर अल-सहलानी यांनी सांगितले की, 'इराणी महिलांनी तीन आठवडे सातत्याने धैर्य दाखवले आहे. स्वातंत्र्याची अंतिम किंमत ते आपल्या जीवाने चुकवत आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT