Salman Rushdie Twitter
ग्लोबल

एका फतव्याने बदलले रश्दींचे आयुष्य, जाणून घ्या त्यांचे जपानी-इटालियनशी संबंध

रश्दी यांना मारण्यासाठी 2.8 दशलक्ष डॉलर्सचे इनाम ठेवण्यात आला असून पहिल्या 6 महिन्यांत 56 वेळा त्यांनी घरे बदलली.

दैनिक गोमन्तक

Salman Rushdie Attack: इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी सलमान रश्दी यांच्या 1988 मधील द सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीसाठी मृत्यूचा फतवा जारी केला होता. या फतव्याच्या 33 वर्षांनंतर काल शुक्रवारी सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. लेखक रश्दी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवर असल्याचे त्यांच्या एजंटने सांगितले होते. चाकूच्या हल्ल्यात त्यांचा एक डोळा आणि यकृताला गंभीर इजा झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

फतव्यामध्ये खोमेनी यांनी जगातील मुस्लिमांना 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशकांना त्वरीत शोधून काढण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरुन भविष्यात इस्लामच्या पवित्र मूल्यांना धक्का लावण्याचे धाडस कोणी करू नये. रश्दी यांना मारण्यासाठी 2.8 दशलक्ष डॉलर्सचे इनाम ठेवण्यात आले होते. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नात जो कोणी मारला जाईल त्याला शहीद समजावे आणि त्याला स्वर्ग मिळेल असे खोमेनी म्हणाले होते. या फतव्याने रश्दींचे आयुष्य कायमचेच बदलून गेले. पुढील 13 वर्षांत, रश्दींनी जोसेफ अँटोन हे टोपणनाव धारण केले आणि पहिल्या 6 महिन्यांत 56 वेळा घरे बदलली.

मात्र, या फतव्याचा केवळ रश्दीच बळी नाही. "द सॅटॅनिक व्हर्सेस" चे जपानी भाषेत भाषांतर करणाऱ्या हितोशी इगाराशी यांची टोकियोच्या ईशान्येकडील सुकुबा युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील एका इमारतीत 1999 मध्ये भोसकून हत्या करण्यात आली होती. त्याच्या शरीरावर चाकूच्या खोल जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. द सॅटॅनिक व्हर्सेसचे इटालियनमध्ये भाषांतर करणार्‍या एटोर कॅप्रिओलो यांच्यावर त्यांच्या मिलान अपार्टमेंटमध्ये हल्ला करण्यात आला. मात्र, तो या हल्ल्यातून वाचला. त्यानंतर ऑक्टोबर 1993 मध्ये, कादंबरीचे नॉर्वेजियन प्रकाशक विल्यम नायगार्ड यांना तीन वेळा गोळ्या घालण्यात आल्या. नायगार्ड त्यांच्या ओस्लो येथील घराबाहेर मृतावस्थेत आढळला. बरे होण्यासाठी त्यांना अनेक महिने रुग्णालयात काढावे लागले.

दरम्यान, 1998 मध्ये ब्रिटनशी राजनैतिक संबंध पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नादरम्यान, इराणचे नेते मोहम्मद खतामी म्हणाले की, इराणने रश्दी यांच्या हत्येच्या कोणत्याही प्रयत्नांना पाठिंबा दिला नाही किंवा अडथळा आणला नाही. जवळजवळ एक दशकानंतर, इराणच्या राज्य वृत्तसंस्थेने सांगितले की फतवा अद्याप लागू आहे आणि रश्दीच्या हत्येचे बक्षीस $3 दशलक्षपेक्षा जास्त झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT