World’s Oldest Living Gorilla Fatou Dainik Gomantak
ग्लोबल

World’s Oldest Gorilla: रंगीत केक कापून 'Fatou' ने साजरा केला 65वा वाढदिवस

जगातील सर्वात वृद्ध गोरिलाचा व्हिडिओ पाहिलात का?

दैनिक गोमन्तक

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आकर्षक दिसणार्‍या जागतिक विक्रमांबद्दल मनोरंजक पोस्ट शेअर करण्यासाठी ओळखले जाते. प्राणीसंग्रहालयात असलेल्या जगातील सर्वात वृद्ध गोरिलाबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेएक हा व्हिडिओ शेअर केला आहे. सर्वात वृद्ध गोरिल्लाचे नाव फटौ (Fatou) आहे. त्याने बर्लिन प्राणीसंग्रहालयात या आठवड्यात 65 वा वाढदिवस साजरा केला आहे. (World’s Oldest Living Gorilla Fatou)

बर्लिन प्राणीसंग्रहालयामध्ये फटौचा वाढदिवस (Birthday) एक सुंदर केक देऊन साजरा करण्यात आला. तो केक फटौला खूप आवडला असून त्याने खूप आवडीने खाल्ला आहे. फटौ दिसायला खरोखरच खूप गोंडस आहे. हा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने (Guinness World Records) आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2.84 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच अनेकांनी कॅमेन्टचा वर्षाव केला आहे.

बर्लिन प्राणीसंग्रहालयाने (Berlin zoo) 13 एप्रिल रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गोरिल्लाच्या वाढदिवसाविषयी पोस्ट केले. "वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय फाटो! आमची गोरिल्ला लेडी आज तिचा 65 वा वाढदिवस साजरा करत आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात वृद्ध गोरिल्ला म्हणून प्रसिद्ध झाली आहे" असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT