Israel-Hamas Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas Conflict: इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य आले समोर

Fact Check: हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलवर अचानक हल्ला केला, ज्यामध्ये शेकडो मारले गेले.

Manish Jadhav

Fact Check: हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलवर अचानक हल्ला केला, ज्यामध्ये शेकडो मारले गेले. तर अनेकांना ओलीस ठेवण्यात आले. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही गाझा पट्टीत हवाई हल्ले केले.

दरम्यान, सोशल मीडियावर शेकडो व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की इस्रायलने ऑपरेशन केले आणि गाझामधील तिसरा टॉवर मिसाईल हल्ला करुन पाडला. मात्र, हा व्हिडिओ दोन वर्षे जुना असल्याचे समोर आले आहे.

व्हिडिओ व्हायरल

फेसबुक आणि एक्सवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला होताना दिसत आहे आणि काही वेळातच ती नष्ट होते. हा व्हिडिओ 7 ऑक्टोबर 2023 रोजी फेसबुकवर विशू पंडित या युजरच्या अकाउंटवरुन अपलोड करण्यात आला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "आणि अशा प्रकारे इस्रायली सैन्याने गाझाचा तिसरा टॉवर देखील उद्ध्वस्त केला. आता इस्रायल (Israel) हमासच्या दहशतवाद्यांना लपण्यासाठीही जागा देणार नाही."

दरम्यान, या व्हिडिओमध्ये गाझा शहरातील अल-शौरोक टॉवर नावाच्या इमारतीवर क्षेपणास्त्राने हल्ला करुन एका बाजूने जमीनदोस्त केल्याचे दिसत आहे. यानंतर दुसऱ्या हल्ल्यात इमारत दुसऱ्या बाजूने कोसळते.

नंतर तिसरा हल्ला होतो आणि त्यावर दोन-तीन क्षेपणास्त्रे पडताच संपूर्ण इमारत कोसळते. या व्हिडिओमध्ये एका बाजूला आंतरराष्ट्रीय मीडिया संस्था अल जझिराचा लोगो दिसत होता. म्हणजेच हा मूळ व्हिडिओ अल जझीराच्या कोणत्यातरी अकाउंटवर अपलोड केलेला असावा.

म्हणून जेव्हा आम्ही गुगल लेन्सच्या मदतीने व्हिडिओची कीफ्रेम शोधली तेव्हा बरेच शोध परिणाम समोर आले. यावेळी, एक YouTube व्हिडिओ सापडला जो अल जझीराच्या अधिकृत YouTube चॅनेल अल जझीरावर अपलोड करण्यात आला होता. जो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

दुसरीकडे, इमारतीवरील क्षेपणास्त्र हल्ल्याचा हा व्हिडिओ 14 मे 2021 रोजी Al Jazeera English वर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओची हेडलाईन होती की- इस्रायलने तिसरा गाझा टॉवर उद्ध्वस्त केला. हा देखील एक मिनिटाचा व्हिडिओ आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "गाझा शहरातील मीडिया कार्यालये असलेला 14 मजली अल-शोरौक टॉवर बुधवारी इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झाला."

यानंतर, जेव्हा कीवर्डच्या मदतीने गुगलवर या घटनेबद्दल शोध घेतला असता अल जझीराची एक बातमी आली. ही बातमी 15 मे 2021 रोजी प्रसिद्ध झाली होती. या बातमीत असे म्हटले होते की, गाझा टॉवर हाऊसिंग अल जझीरा ऑफिस इस्त्रायली हल्ल्यात नष्ट झाले.

गाझा पट्टीतील अल जझीरासह आंतरराष्ट्रीय मीडिया कार्यालयांच्या इमारतीवर इस्रायलने हवाई हल्ला केला, ज्यामध्ये इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

फॅक्ट चेकमध्ये काय निष्पन्न झाले?

जेव्हा या व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्यात आली तेव्हा हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ 2021 मधील आहे. जून 2021 मध्ये, गाझामधील अल-शोरौक टॉवर इस्रायली हवाई हल्ल्यांत उद्ध्वस्त झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Opening Ceremony: 55व्या इफ्फीच्या ग्रॅंड ओपनिंग सेरेमनीला दिग्गज लावणार हजेरी; गोव्यात अवतरणार अवघे बॉलिवूड!

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Goa News: लखनौला जाणारे विमान उड्डाणानंतर 20 मिनिटांनी माघारी परतले, गोंधळाची स्थिती; गोव्यातील ठळक घडामोडी!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT