Facebook launches its 'bulletin newspaper' Dainik Gomantak
ग्लोबल

फेसबुकने लाँच केले आपले 'बुलेटिन वृत्तपत्र'

फेसबुकने एप्रिल मध्येच असे सांगितले होत की फेसबुक या प्रकाशन व्यासपीठावर लिहिण्यासाठी स्वतंत्र स्थानिक पत्रकार भरती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार

दैनिक गोमन्तक

फेसबुक(Facebook) इन्कने आपले बुलेटिन(News Bulletin) उत्पादन वृत्तपत्र मंगळवारी बाजारपेठेत लाँच केल आहे. फेसबुकच्या म्हणण्यानुसारआमचा प्रतिस्पर्धी सबस्टॅकला टक्कर देण्याचे आमचे लक्ष्य असून आमची ही सेवा नि: शुल्क आणि सशुल्क लेख आणि पॉडकास्टचे एक स्वतंत्र विचारांचे व्यसपीठ आहे.

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी बुलेटिन डॉट कॉमवर लाइव्ह असलेल्या व्यासपीठाची घोषणा करत फेसबुकवर लाइव्ह ऑडिओ रूममध्ये कंपनीने या कामांसाठी भरती केलेलया काही लेखकांचीही ओळख करून दिली आहे.

या संदर्भात आपली प्रतिक्रिया देताना फेसबुकने म्हण्टले आहे की मागील काही वर्षांपासून हाय-प्रोफाईल पत्रकार आणि लेखकांनी स्वत:हून मोठ्या मीडिया कांपनी सोडून स्वतःच काहीतरी करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांना एकत्र करून फेसबुक त्यांना ईमेल वृत्तपत्राच्या प्रवृत्तीमध्ये भाग घेण्यासाठी जोर देत आहे.

बुलेटिन निर्मात्यांच्या प्रारंभाच्या उत्पन्नात कपात होणार नाही आणि निर्माता त्यांचे वर्गणीचे मूल्य निवडू शकतील, असे फेसबुकने म्हटले आहे.फेसबुक हे जे व्यासपीठ लॉन्च करीत आहे त्यात स्पोर्टक्रस्टर एरिन अँड्र्यूज, लेखक माल्कम ग्लेडवेल आणि "क्यूअर आय" स्टार टॅन फ्रान्स यासह अनेक मोठी लोक आणि लेखक आहेत.

फेसबुकच्या म्हणण्यानुसार न्यूज इंडस्ट्रीबरोबर सोशल नेटवर्किंगचे गोंधळलेले नातेसंबंध आहेत. फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन सरकारने एका आशयाचे वृत्तपत्रे देण्याबाबत ऑस्ट्रेलियन सरकारने केलेल्या निंदानालस्तीनंतर ही बातमी प्रसिद्ध झाली. या संघर्षानंतर, फेसबुकने पुढील तीन वर्षांत जागतिक स्तरावर न्यूज इंडस्ट्रीत 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते.

कंपनीने म्हटले आहे की हे लेख आणि पॉडकास्ट फेसबुक न्यूज फीड व फेसबुकच्या न्यूज विभागात उपलब्ध असतील.

तसेच “आम्ही केवळ वेगळ्या वेबसाइटवर बुलेटिन तयार केले जेणेकरुन निर्माता केवळ त्यांचा प्लॅटफॉर्मवर अवलंबून नसलेल्या मार्गाने त्यांचा प्रेक्षक वाढवू शकतील.” अशा अश्याच एक मुद्दाही ही फेसबुककडून या न्युज साईटवर मांडण्यात आला आहे.

फेसबुकने एप्रिल मध्येच असे सांगितले होत की फेसबुक या प्रकाशन व्यासपीठावर लिहिण्यासाठी स्वतंत्र स्थानिक पत्रकार भरती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आणि त्याचप्रमाणे फेकबूकने आता त्याची सुरवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT