Expressing Gratitude Reduce Heart Attack Risk Research Suggests Dainik Gomantak
ग्लोबल

Thank You म्हणल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो, संशोधनातून आले समोर

Expressing Gratitude Reduce Heart Attack Risk Research Suggests: थॅंक्यू म्हटल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. होय, हे खरे आहे. एक संशोधनातून याची पुष्टी झाली आहे.

Manish Jadhav

Expressing Gratitude Reduce Heart Attack Risk Research Suggests: थॅंक्यू म्हटल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. होय, हे खरे आहे. एक संशोधनातून याची पुष्टी झाली आहे. संशोधनानुसार, एका अभ्यासात सहभागी झालेल्या 900 हून अधिक लोकांना प्रश्न विचारण्यात आले आणि निष्कर्षांवरुन असे दिसून आले की ज्यांनी सर्वात जास्त 'कृतज्ञता व्यक्त केली' त्यांना पुढील 4 ते 9 वर्षांत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी आहे. हे सूचित करते की, आपण ज्या गोष्टींसाठी 'कृतज्ञ' आहात त्यांची एक छोटी यादी ठेवल्याने जीवनात समाधान मिळू शकते. तथापि, अभ्यासात असेही आढळून आले आहे की अशा लोकांना तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागला तर त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात.

अभ्यासानुसार, संशोधनाचे निष्कर्ष हे देखील स्पष्ट केले जाऊ शकतात की जे लोक तणावपूर्ण परिस्थितीत अधिक प्रयत्न करण्यास इच्छुक असतात ते जीवनात सामान्यतः सर्वात कृतज्ञ असतात. यामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात, परंतु याचा अर्थ ते कमी तणावग्रस्त आहेत. असेही म्हटले आहे की, शांत लोक सामान्यतः निरोगी जीवन जगतात, त्यामुळे अशा लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते.

दरम्यान, या अभ्यासाचे नेतृत्व करणारे आयर्लंडमधील मायनूथ विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ ब्रायन लेव्ही म्हणाले की, सकारात्मक भावना हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करतात. बायोलॉजिकल सायकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, अमेरिकेतील सरासरी 57 वर्षे वय असलेल्या 912 लोकांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांच्या चाचण्या घेतल्या

अहवालानुसार, निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी चाचणीही घेण्यात आली. अभ्यासात सामील असलेल्या लोकांसमोर काही शब्द लिहिले होते, ज्याचा रंग लाल होता. या शब्दांचा फॉन्ट रंग कधीकधी बदलला. अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांना शब्दांऐवजी फॉन्टच्या बदलत्या रंगांबाबत उत्तरे देण्यास सांगण्यात आले. त्यांनी पटकन प्रतिसाद न दिल्यास त्यांची उत्तरेच चुकीची मानली जातील, असेही सांगण्यात आले. दरम्यान, जे लोक त्यांच्या आयुष्यातील गोष्टी आणि लोकांबद्दल कृतज्ञ होते. मात्र, उत्तर देण्याच्या प्रयत्नात ज्यावेळी प्रेशर वाढले तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होती.

अभ्यासात असे दिसून आले की, जे लोक सर्वात जास्त कृतज्ञ होते त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होती. परिणामांपर्यंत पोहोचण्यासाठी, अभ्यासात सहभागी लोकांचे वय, बॉडी मास इंडेक्स (BMI) आणि धूम्रपान देखील विचारात घेतले गेले. अभ्यासात समाविष्ट असलेल्या एक तृतीयांश लोकांना उच्च रक्तदाब होता आणि 10 पैकी एकाला मधुमेह देखील होता. या दोन्हींमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही जास्त असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope:नोकरीत सांभाळा,आरोग्याचा विचार करा, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; वाचा तुमची रास काय सांगते?

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

SCROLL FOR NEXT