US Embassy in Baghdad Dainik Gomantak
ग्लोबल

US Embassy in Baghdad: बगदादमधील अमेरिकन दूतावासाजवळ स्फोट, ऑक्टोबरपासून आतापर्यंत 70 हून अधिक हल्ले!

US Embassy: शुक्रवारी पहाटे इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकन दूतावासाबाहेर पुन्हा एकदा स्फोटांचा आवाज ऐकू आला.

Manish Jadhav

Explosive Attacks Near US Embassy in Baghdad: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध भयानक रुप धारण करत आहे. युद्धविरामानंतर इस्रायलने पुन्हा गाझावरील हल्ले तीव्र केले आहेत. दरम्यान, शुक्रवारी पहाटे इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकन दूतावासाबाहेर पुन्हा एकदा स्फोटांचा आवाज ऐकू आला. अचानक स्फोट झाल्याने गोंधळ उडाला. बॉम्बस्फोटाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमेरिकन राजनयिक अधिकारी सुरक्षित आहेत. मात्र, दूतावासाच्या प्रवक्त्यांनी याप्रकरणी भाष्य करण्यास नकार दिला असला तरी अचानक झालेल्या स्फोटामुळे अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑक्टोबरपासून इराक आणि सीरियातील लष्करी तळांवर 70 हून अधिक हल्ले झाले आहेत, ज्याची जबाबदारी इराकी शिया मुस्लिम सशस्त्र गटांच्या एका विद्यार्थी संघटनेने स्वीकारली आहे. परंतु शुक्रवारी सकाळी अमेरिकन दूतावासाजवळ स्फोट झाला. संध्याकाळी 4 च्या सुमारास झालेल्या या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.

ऑक्टोबरमध्येही अमेरिकन सैन्यावर हल्ला झाला होता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायल-हमास युद्धामुळे अमेरिकन सैनिकांना लक्ष्य केले जात आहे. ऑक्टोबर महिन्यातही इराकमध्ये अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करण्यात आले होते. सुमारे 3 हल्ले झाले, ज्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु वाहनांचे मोठे नुकसान झाले. इस्रायल-हमास युद्धाच्या सुरुवातीपासूनच अमेरिका आणि अमेरिकन जनतेला लक्ष्य केले जात आहे. अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने आणि इराकमध्ये तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याने उत्तर इराकच्या मोसुल शहरात झालेल्या या हल्ल्यावर भाष्य केले नाही, परंतु एका अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने पुष्टी केली की, लष्कराच्या ताफ्यावर आयईडी स्फोटाने हल्ला झाला होता.

इराकी शिया धर्मगुरु मुक्तदा अल-सद्र अमेरिकेच्या विरोधात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराकमधील सद्रिस्ट चळवळीचा नेता मुक्तदा अल-सद्र याने इराकमधील अमेरिकन दूतावासाच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. तो इराकमधील अमेरिकन दूतावास बंद करण्याची मागणी करत आहे. त्याने X वर पोस्ट करत म्हटले की, 'मी इराकमधील शिया मुस्लिमांचा सर्वात मोठा नेता आहे.' दुसरीकडे, तो इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या जवळचा आहे. इराक युद्धादरम्यान त्याने अमेरिकन सैन्याविरुद्ध महदी आर्मीचे नेतृत्व केले होते. आता इस्रायल-हमास युद्धामुळे तो इराकमधील अमेरिकन दूतावासाच्या विरोधात आंदोलन करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT