Expensive 'fruit drink' does not contain fruits, customer sues Starbucks for 41 crores. Dainik Gomantak
ग्लोबल

Starbucks: महागड्या 'फ्रुट ड्रिंक'मध्ये फळंच नाहीत, ग्राहकाचा स्टारबक्सविरुद्ध ४१ कोटींचा खटला

Starbucks: आता खटला हरला तर 41 कोटी रुपये भरावे लागतील. त्यामुळेच स्टारबक्सने हे प्रकरण फेटाळण्याची विनंती केली आहे.

Ashutosh Masgaunde

Expensive 'fruit drink' does not contain fruits, customer sues Starbucks for 41 crores:

गेल्या 5 दशकांपासून जगभरात स्टारबक्स ही कॉफी शॉपची सर्वात मोठी चेन सेवा देत आहे. त्यांचे 80 देशांमध्ये 30 हजार स्टोअर्स आहेत. स्टारबक्स एक-दोन नव्हे, तर '८७ हजार' वेगवेगळ्या प्रकारची कॉफी विकते.

मात्र इतकी वैविध्यपूर्ण सेवा देणारी स्टारबक्स आता एका वेगळ्या वादत सापडली आहे. झाले असे की, दोन ग्राहकांनी स्टारबक्सच्या फ्रुट ड्रिंकमध्ये फ्रुट्सचं नसल्याचा दावा केला आहे. तसेच कंपनीविरुद्ध 41 कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दोन ग्राहकांनी 'स्टारबक्स'वर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की स्टारबक्सच्या अनेक रिफ्रेशर पेयांच्या नावात 'अकाई', 'पॅशनफ्रुट' किंवा 'मँगो' असे शब्द असूनही, पेयांमधील घटकांमध्ये ही फळे नसतात.

या ग्राहकांनी न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात 5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 41 कोटी रुपये) किमतीचा क्लास-अॅक्शन लॉ खटला दाखल केला आणि आरोप केला की स्टारबक्स त्याच्या 'रिफ्रेशर्स ड्रिंक्स'मधून भरपूर पैसे कमवत आहे.

हिरव्या कॉफीचा अर्क, पाणी आणि फळांच्या रसापासून बनवलेल्या पेयांचा एक मेनू आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात फळं नाहीत. कंपनीने त्यामध्ये फळं असल्यासारखी जाहिरात केली आहे.

तक्रारदार ग्राहक म्हणात आहेत, कंपनी या ड्रिंकमध्ये फळं असल्याची जाहिरात करत होती. त्यामुळे आम्ही पैसे खर्चून फ्रुट ड्रिंक खरेदी केले होते.

आता केस हरली तर 41 कोटी रुपये भरावे लागतील. त्यामुळेच स्टारबक्सने हे प्रकरण फेटाळण्याची विनंती केली आहे.

कोणत्याही नियमित ग्राहकाची उत्पादनाच्या नावाने दिशाभूल होणार नाही, अशा पद्धतीनेच आम्ही जाहिरात केली होती. फ्रुट ड्रिंकच्या चवीचं वर्णन करता यावे यासाठी त्यामध्ये फळाचं नाव आहे. असा युक्तीवाद स्टारबक्सने केला आहे.

जिल्हा न्यायाधीश जॉन पी. क्रोनन यांनी स्टारबक्सचा अर्ज फेटाळून लावला आहे. ते म्हणाले अशा नावांमुळे सर्वसामान्यांची दिशाभूल होऊ शकते. आणि काही स्टारबक्स ड्रिंक्सचे नाव त्यामध्ये असलेल्या घटकांवरुन दिले आहे. त्यामुळे ग्राहकाचा गैरसमज होणे शक्य आहे.

फोर्ब्सला दिलेल्या निवेदनात स्टारबक्सच्या प्रवक्त्याने तक्रारीत केलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT