Imran Khan Gets 7 Year Sentence Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan Gets 7 Year Sentence: इम्रान खानला आठवडाभरात तिसरा झटका, कोर्टाने पत्नी बुशरा बीबीसह सुनावली 7 वर्षांची शिक्षा

Imran Khan: रावळपिंडी न्यायालयाने शनिवारी इम्रान खान आणि बुशरा बीबी यांना प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावली.

Manish Jadhav

Imran Khan Gets 7 Year Sentence: पाकिस्तानात 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रावळपिंडी न्यायालयाने शनिवारी इम्रान खान आणि बुशरा बीबी यांना प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावली. दरम्यान, त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे.

इम्रान आणि बुशरा बीबी यांचा विवाह गैर-इस्लामिक

दरम्यान, न्यायालयाने इम्रान खान आणि बुशरा बीबी यांचा विवाह गैर-इस्लामिक असल्याचे म्हटले आहे. बुशरा बीबीचा पहिला पती खवर फरीद मनेका याच्या तक्रारीवरुन न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. विशेष म्हणजे, या आठवड्यात इम्रान खान यांना सायफर प्रकरणात 10 वर्षांचा तुरुंगवास आणि तोशाखाना प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वीच इम्रान यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

निवडणूक चिन्हाशिवाय इम्रान यांचा पक्ष मैदानात

आधीच इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) त्यांच्या निवडणूक चिन्हाशिवाय (बीएटी) निवडणूक लढवत आहे. पक्षाचा पाया रचणारे इम्रान खान स्वतः तुरुंगात आहेत. सध्या ते रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. सायफर प्रकरणात त्यांना ऑफिशियल इंटेलिजन्स ॲक्ट अंतर्गत 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

इम्रान यांच्या पक्षावर बंदी येऊ शकते: रिपोर्ट

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, इम्रान खान यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचा पक्ष 'पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय) वर बंदी घातली जाऊ शकते. सध्या प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये पीटीआयचे संस्थापक आणि इतर नेत्यांचा निकाल आल्यानंतर पीटीआयवर बंदी घालणे शक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या निधीबाबत अनेक वर्षांच्या चौकशीनंतर, ऑगस्ट 2003 मध्ये पक्षाला 'बेकायदेशीर निधी' मिळाल्याची एकमताने घोषणा केली. यामुळे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) च्या नेतृत्वाखालील पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) सरकारला पक्ष विसर्जित करण्याची संधी मिळाली. 'जिओ न्यूज'च्या रिपोर्टनुसार, खान यांना संसदेतून अपात्र ठरवण्यात आले.

तसेच, 9 मे 2023 रोजी पाकिस्तानी रेंजर्सनी खान यांना अटक केल्यानंतर इस्लामाबादमध्ये हिंसक निदर्शने झाली. खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयासह 20 हून अधिक लष्करी कार्यालयांना आग लावण्यात आली. 9 मे रोजी समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर पक्ष अडचणीत आला होता. हल्ल्यानंतरच्या काही दिवसांत शेकडो दंगलखोरांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर विविध आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT