Imran Khan: दोन दिवसांत दुहेरी धक्का, आता इम्रान खानसह पत्नी बुशरा बीबीला 14 वर्षांची शिक्षा

Former Pakistan Prime Minister Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दोन दिवसांत दुसरा मोठा धक्का बसला आहे.
Former Pakistan Prime Minister Imran Khan & Bushra Bibi
Former Pakistan Prime Minister Imran Khan & Bushra BibiDainik Gomantak
Published on
Updated on

Former Pakistan Prime Minister Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दोन दिवसांत दुसरा मोठा धक्का बसला आहे. तोशाखाना प्रकरणी न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने दोघांनाही 10 वर्षांसाठी कोणत्याही सार्वजनिक पदावर बहाल करण्यास मनाई केली आहे. न्यायालयाने त्यांना 78.7 कोटी रुपयांचा सामूहिक दंडही ठोठावला आहे. बुशरा बीबी आज न्यायालयात हजर राहिल्या नाहीत.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये (Pakistan) आठ दिवसांनी म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होत असताना न्यायालयाचा हा निर्णय आला आहे. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ निवडणूक आयोगाच्या कठोर कारवाईदरम्यान कोणत्याही निवडणूक चिन्हाशिवाय निवडणूक लढवत आहे. एक दिवस आधी, गोपनीयता कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने इम्रान खान (Imran Khan) आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यातच आता, रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी नवीन शिक्षा सुनावली. इम्रान खान याच तुरुंगात बंद आहेत. आता इम्रान खान यांना सुनावण्यात आलेल्या दोन्ही शिक्षा एकत्र चालणार की स्वतंत्रपणे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Former Pakistan Prime Minister Imran Khan & Bushra Bibi
Imran Khan: सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी इम्रान खानला मोठा झटका, न्यायालयाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा

दुसरीकडे, पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी युरोपसह अरब देशांना भेटी दिल्या होत्या, तेव्हा तेथील राष्ट्राध्यक्षांनी त्यांना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, ज्या इम्रान यांनी तोशाखान्यात जमा केल्या, पण नंतर त्यांनी त्या भेटवस्तू स्वस्तात विकल्या, असा आरोप आहे. इम्रान यांनी सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाला सांगितले होते की, या भेटवस्तू तोषखान्यातून 2.15 कोटी रुपयांना खरेदी केल्या होत्या आणि त्या विकून त्यांना सुमारे 5.8 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.

इम्रान यांच्या पक्षावर बंदी येऊ शकते: रिपोर्ट

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, इम्रान खान यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचा पक्ष 'पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय) वर बंदी घातली जाऊ शकते. सध्या प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये पीटीआयचे संस्थापक आणि इतर नेत्यांचा निकाल आल्यानंतर पीटीआयवर बंदी घालणे शक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या निधीबाबत अनेक वर्षांच्या चौकशीनंतर, ऑगस्ट 2003 मध्ये पक्षाला 'बेकायदेशीर निधी' मिळाल्याची एकमताने घोषणा केली. यामुळे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) च्या नेतृत्वाखालील पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) सरकारला पक्ष विसर्जित करण्याची संधी मिळाली. 'जिओ न्यूज'च्या रिपोर्टनुसार, खान यांना संसदेतून अपात्र ठरवण्यात आले.

Former Pakistan Prime Minister Imran Khan & Bushra Bibi
Pakistan Election: पुन्हा पंतप्रधान होण्याचे स्पप्न भंगणार? Imran Khan यांचे उमेदवारी अर्ज दोन मतदारसंघातून फेटाळले

तसेच, 9 मे 2023 रोजी पाकिस्तानी रेंजर्सनी खान यांना अटक केल्यानंतर इस्लामाबादमध्ये हिंसक निदर्शने झाली. खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयासह 20 हून अधिक लष्करी कार्यालयांना आग लावण्यात आली. 9 मे रोजी समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर पक्ष अडचणीत आला होता. हल्ल्यानंतरच्या काही दिवसांत शेकडो दंगलखोरांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर विविध आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com