ग्लोबल

Euro 2024: तीन वेळच्या चॅम्पियन स्पेनने क्रोएशियाचा उडवला धुव्वा; युरो 2024 मधील मोहिमेची केली शानदार सुरुवात

Euro 2024: तीन वेळच्या चॅम्पियन स्पेनने शनिवारी (15 जून) बर्लिनमध्ये क्रोएशियावर जबरदस्त विजय मिळवून युरो 2024 मधील मोहिमेची सुरुवात केली.

Manish Jadhav

Euro 2024: तीन वेळच्या चॅम्पियन स्पेनने शनिवारी (15 जून) बर्लिनमध्ये क्रोएशियावर जबरदस्त विजय मिळवून युरो 2024 मधील मोहिमेची सुरुवात केली. स्पेनसाठी कर्णधार अल्वारो मोराटाने 29व्या मिनिटाला, फॅबियन रुईझने 32व्या मिनिटाला आणि कार्वाजलने 45+2व्या मिनिटाला गोल केले. उत्तरार्धात एकही गोल होऊ शकला नाही. क्रोएशियन संघाला पेनल्टी देण्यात आली तरी संघाला गोल करण्यात अपयश आले. अखेर स्पेनने 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर स्पेनने ग्रुप B मध्ये टॉप केले.

आता जेव्हा स्पेनचा संघ पुन्हा मैदानात उतरेल तेव्हा त्याचा पुढील फेरीत धडक मारण्याचा विचार असेल. स्पेन-क्रोएशियाच्या या शानदार सामन्यात डॅनी कार्वाजलने वयाच्या 32 वर्षी युरो कपमध्ये जबरदस्त गोल केला. या स्पर्धेत स्पेनसाठी गोल करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्याच्या गोलला लामिन यामहॉल याने असिस्ट केले. यामहॉल स्पर्धेच्या इतिहासात असिस्ट करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

दरम्यान, ऑलिम्पियास्टॅडियन बर्लिन येथे स्पेन आणि क्रोएशिया यांच्यात मैदानावर विजयासाठी निकराची लढाई पाहायला मिळाली. सामना कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. कधी स्पेनच्या तर क्रोएशियाच्या बाजूने सामन्याचं पारडं झुकताना दिसत होतं. रॉड्रिने क्रोएशियाच्या ब्रुनो पेटकोविचला पेनल्टी बॉक्समध्ये आणले. पेटकोविचची स्पॉट-किक उनाई सायमनने वाचवली तरी इव्हान पेरिसिकच्या मदतीने त्याने रिबाऊंडमधून गोल केला.

क्रोएशियाच्या खेळाडूंनी पेटकोविचच्या गोलनंतर आनंद साजरा करण्यास सुरुवात केली, मात्र रेफ्रीने त्यांच्या आनंदावर विरझन टाकले. रेफ्रीने पेटकोविचचा गोल नाकारला. मात्र, रिप्ले पाहिल्यानंतर VAR अधिकारी आणि रेफरीच्या लक्षात आले की, पेरिसिक पेनल्टी घेण्यापूर्वी बॉक्समध्ये गेला होता. यास पेनल्टी किकमध्ये 'अतिक्रमण' म्हणतात. यास परवानगी नाही, त्यामुळे गोल रिटेक न करता नाकारला गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jogamma Jogappa History: कार्तवीर्य अर्जुनाने जमदग्नीचा वध केल्याने रेणुका विधवा झाली; जोगम्मा आणि जोगप्पाची कथा

"शाहबाज शरीफ आणि आसिफ मुनीर महान लोक...''; दहशतवाद पसरवणाऱ्यांना ट्रम्प यांच्याकडून 'ग्रेट पीपल'चा दर्जा, आसियान परिषदेत उधळली स्तुतीसुमने

Upcoming Phones: Realme, OnePlus... 'या' आठवड्यात लॉन्च होणार 'हे' जबरदस्त स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच…

गोमंतकीय जोडप्याने मणिपूरात उभारले प्रार्थनास्थळ; मुनपी गावात पहिल्यावहिल्या 'सेंट जोसेफ चर्च'चे लोकार्पण!

ENG vs NZ 1st ODI: इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचा महाविक्रम! 32 वर्षांपूर्वीचा रॉबिन स्मिथचा मोडला रेकॉर्ड; एकाकी लढत देऊन ठोकले 'दमदार शतक' VIDEO

SCROLL FOR NEXT