Ursula von der Leyen Dainik Gomantak
ग्लोबल

युरोपियन युनियनने रशियासाठी आखली तेल बंदीची योजना

हा प्रस्ताव 27 सदस्य राष्ट्रांकडे मंजुरीसाठी प्रस्तावित

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपता - संपत नाहीये. सुमारे दोन महिने हा वाद जगातील अनेक राष्ट्रांनी मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रश्न अजुन ही तसाच धगधगत आहे. या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनने रशियासाठी तेल बंदीची योजना आखली आहे. ( EU approves oil embargo for Russia)

युरोपियन युनियनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी युक्रेनमधील युद्धावर रशियावर टप्प्याटप्प्याने तेल बंदीचा प्रस्ताव आखला जाणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच रशियाच्या सर्वोच्च बँकेला मंजुरी दिली आणि रशियन ब्रॉडकास्टर्सवर बंदी घातली आहे. ही योजना, EU सरकारांनी मान्य केल्यास, रशियन ऊर्जेवर अवलंबून असलेल्या आणि पर्यायी पुरवठा शोधणे आवश्यक असलेल्या जगातील सर्वात मोठ्या व्यापारी गटांना याचा सामना करावा लागणार आहे.

रशियाने जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने युक्रेनवर केलेले आक्रमण, पूर्व युक्रेनमध्ये नूतनीकरण केलेले रशियन आक्रमण आणि युक्रेनियन शहरांमधील कत्तलीच्या हे सारे आतापर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध आहेत. आयोगाच्या उपाययोजनांमध्ये सहा महिन्यांच्या आत रशियन कच्च्या तेलाचा पुरवठा आणि 2022 च्या अखेरीस परिष्कृत उत्पादनांचा समावेश आहे.

पुढे बोलताना वॉन डेर लेयन म्हणाल्या कि रशियन तेलावरील आमचे अवलंबित्व कमी करत आहोत. हे सोपे नाही कारण काही सदस्य राष्ट्रे रशियन तेलावर पूर्णपणे अवलंबून आहेत, परंतु आम्हाला ते करायचे आहे. असे असले तरी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या क्रूर आक्रमकतेची किंमत चुकवावी लागेल.

तसेच आम्ही उच्च पदाधीकारी, रशियन लष्करी अधिकारी यांच्या मालमत्ता गोठवल्या जातील आणि प्रवासी बंदी करण्यास येईल. या प्रस्तावांना आता 27 सदस्य राष्ट्रांकडे मंजुरीसाठी जावे लागेल. मुत्सद्दींनी सांगितले की हंगेरी आणि स्लोव्हाकियाला तेल आयात थांबवण्यासाठी दीर्घ कालावधी दिला जाण्याची शक्यता आहे. कारण ते रशियन ऊर्जेवर खूप अवलंबून आहेत. त्यामूळे रशियावर याचे काय परिणाम होतात हे पाहणे म्हत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT