UNSC
UNSC Dainik Gomantak
ग्लोबल

UNSC मध्ये अफगाणिस्तान परिस्थितीवर तातडीची बैठक

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधून (Afghanistan) अमेरिकी आणि नाटो सैन्यांनी परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबान आणि अफगाण सरकार यांच्यात युध्दजनक परिस्थिती निर्माण झाली. याच पाश्वभूमीवर सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) इस्टोनिया (Estonia) आणि नॉर्वेच्या (Norway) विनंतीवरुन अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर तातडीची बैठक घेईल. परिषदेच्या मुत्सद्यांनी रविवारी सांगितले की, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांनी तालिबान्यांनी राजधानी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थितीबद्दल कौन्सिल सदस्यांना माहिती देतील.

संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी शुक्रवारी तालिबानला अफगाणिस्तानमधील हल्ले त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. दीर्घकाळ चालणारे गृहयुद्ध संपवण्यासाठी चांगल्या हेतूने चर्चा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तालिबान विशेषत: त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रातील महिला आणि पत्रकारांना लक्ष्य करत कठोर निर्बंध लादत असल्याचे सुरुवातीच्या संकेतांवरही त्यांनी आपल्या प्रकट केल्या. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या अध्यक्षतेखाली अफगाणिस्तानबाबतची ही दुसरी बैठक आहे.

याआधी, अफगाणिस्तानमधील वेगाने बदलत असलेल्या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करत, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी रविवारी तालिबान आणि इतर सर्व पक्षांना जीवनाच्या संरक्षणासाठी संयम बाळगण्याचे आणि मानवतावादी गरजा पूर्ण करण्याची खात्री करण्याचे आवाहन केले. त्यात असेही म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रसंघ शांततापूर्ण उपाययोजना आणि सर्व अफगाणांच्या मानवी हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे.

देशाचे रक्षण करण्यासाठी गेली 20 वर्षे आयुष्य समर्पित- अशरफ घनी

त्याचवेळी, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज आपण एका कठिण वेळेचा सामना करत आहोत. घनी म्हणाले की, मला सशस्त्र तालिबानचा सामना करावा लागेल म्हणून ज्यांना राजवाड्यात प्रवेश करायचा होता किंवा प्रिय देश (अफगाणिस्तान) सोडायचा होता, ज्यांच्या संरक्षणासाठी मी गेली 20 वर्षे माझे आयुष्य समर्पित केले आहे.

तलवार आणि बंदुकांच्या धाकाने तालिबानने वर्चस्व मिळवले : अशरफ घनी

अशरफ घनी म्हणाले की, देशातील रक्तरंजित घटना टाळण्यासाठी, मला वाटले की बाहेर पडणे योग्य. तालिबानने तलवारी आणि बंदुकाच्या धाकाने वर्चस्व मिळवले असून आता देशवासीयांच्या सन्मान, संपत्ती आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तालिबानने अफगाणिस्तानातील लोकांची कायदेशीरपणे मने जिंकण्याचे आश्वासन देणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी एक स्पष्ट योजना बनवा आणि ती लोकांसमोर ठेवा. मी नेहमीच विकासाची योजना घेऊन माझ्या देशाची सेवा करत राहीन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT