Air India Dainik Gomantak
ग्लोबल

Air India Emergency landing: अमेरिकेहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे स्वीडनमध्ये इमर्जन्सी लँडिंग

विमानातील 300 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे स्टॉकहोम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. फ्लाइटमध्ये 300 प्रवासी होते. सर्व सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. पण कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून विमानतळावर अग्निशमन दलाचे पथक आधीच तैनात करण्यात आले होते.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तेल गळतीनंतर (Oil Leak)इंजिन बंद झाले आणि नंतर फ्लाइट स्टॉकहोममध्ये सुरक्षितपणे लॅंड झाले. अधिकाऱ्याने सांगितले की,जमिनीच्या तपासणीदरम्यान दुसऱ्या इंजिनच्या ड्रेन मास्टमधून तेल बाहेर पडताना दिसले. यापूर्वी सोमवारी म्हणजेच 20 फेब्रुवारी न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान वैद्यकीय आणीबाणीमुळे लंडनला वळवण्यात आले होते.

दिल्ली विमानतळावर २१ फेब्रुवारीला रात्री उशिरा मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवासी आणि एअरलाइन्सला उशीर झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चार तास जोरदार वादावादी झाली. दिल्ली-मुंबई फ्लाइटमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने एएनआयला सांगितले की फ्लाइट AI-805 ची वेळ रात्री 8 वाजता होती परंतु ती तीन वेळा बदलण्यात आली. दुपारी 12.30 च्या सुमारास विमानाने उड्डाण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT