Elon Musk Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk यांनी 646 कोटींच्या जेटची दिली ऑर्डर, मस्क यांची आणखी एक मोठी डील

Elon Musk New Jet: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात.

दैनिक गोमन्तक

Elon Musk New Jet: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतल्यानंतर एलन मस्क यांनी आणखी एक मोठा करार केला आहे. वास्तविक, ट्विटरच्या नव्या बॉसने स्वतःसाठी एक महागडे आणि आलिशान जेट ऑर्डर केले आहे. त्यांच्या खाजगी जेटची किंमत 78 दशलक्ष डॉलर्स किंवा सुमारे 6 अब्ज रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

गल्फस्ट्रीम G700 जेट ऑर्डर केले

बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, टेस्ला (Tesla), स्पेसएक्स आणि ट्विटर सारख्या मोठ्या कंपन्यांचे मालक एलन मस्क हे खाजगी जेटचे मोठे चाहते आहेत. आता त्यांच्या विमानांच्या कलेक्शनमध्ये आणखी एक लक्झरी विमान दाखल होणार आहे. रिपोर्टनुसार, त्यांनी स्वत:साठी गल्फस्ट्रीम G700 जेट ऑर्डर केले आहे.

2019 मध्ये लाँच करण्यात आले

G700 हे गल्फस्ट्रीम लक्झरी आणि अगदी नवीन जेट आहे. हे विमान ऑक्टोबर 2019 मध्येच लॉन्च करण्यात आले होते. वास्तविक, एलन मस्क नियमित विमानानेच प्रवास करतात. त्यांनी G650ER जेटमध्ये सुमारे 150,000 मैलांचा प्रवास केला होता. मात्र, आतापर्यंत एलन मस्क किंवा त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

उत्तम सुविधांनी सुसज्ज विमान

गल्‍फस्ट्रीमच्‍या नवीन विमानांपैकी एक, G700 हे त्‍याच्‍या लक्झरी फिचर्समुळे चर्चेत आहे. तथापि, ते उड्डाण करण्यासाठी खर्च देखील खूप जास्त आहे. लिबर्टी जेटच्या अहवालानुसार, सुमारे 400 तास उड्डाण करण्यासाठी $3.5 दशलक्ष खर्च येतो. यात 19 जणांची आसनक्षमता आहे. याशिवाय इंटरटेन्मेंट सूइट आणि डाइनिंग एरिया समाविष्ट आहे.

गल्फस्ट्रीमनुसार, त्याची लांबी 109 फूट 10 इंच आणि उंची 25 फूट पाच इंच आहे. त्याची अधिकतम रेंज 7,500 नॉटिकल मैल आहे. जेटने जॉर्जिया ते जिनिव्हा हे अंतर 7 तास 37 मिनिटांत कापले. याशिवाय यात वाय-फाय यंत्रणा, 20 खिडक्या आणि दोन मोठी स्वच्छतागृहे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT