गोमन्तक डिजिटल टीम
एलन मस्क हे भन्नाट व्यक्तिमत्व आहे. ते जितके लहरी वाटतात तितकेच ते बुद्धीमान आहेत. स्वतःला गुंतवणूकदार म्हणून घेण्यापेक्षा इंजिनियर म्हणवून घेणे त्यांना आवडते.
मस्क यांनी अंतराळ संशोधनातील तंत्रज्ञानावर काम करताना 2002 मध्ये 'स्पेस-एक्स' कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून मंगळ ग्रहावर मानवाला नेण्याचे मस्क यांचे स्वप्न आहे.
2004 मध्ये त्यांनी टेस्ला ही इलेक्ट्रिक कार कंपनी सुरू केली. एक वेळ अशी होती की मस्क टेस्ला कंपनी गुगलला 6 बिलियन डॉलरला विकणार होते. पुढे टेस्लाने मस्क यांना लाखो रूपये नफा कमवून दिला.
मस्क यांनी 2016 मध्ये सोलर सिटी कंपनी टेकओव्हर केली. यात घराच्या छतावर आणि भींतीवर सोलर टाईल्स लावून सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती केली जाणार आहे.
याशिवाय न्यूरोलिंक कंपनीच्या माध्यमातून मानवाचा मेंदू संगणकाशी जोडण्यावर मस्क काम करत आहेत.
2020 मध्ये मस्क यांनी स्वतःचे सर्व 7 अलिशान बंगले विकले. ते आता एका 20 बाय 20 फुटाच्या भाड्याच्या घरात राहतात. हे फोल्डेबल घर पोर्टेबल असून ते बॉक्सेबल नावाच्या हाऊसिंग स्टार्टअपने बनवले आहे.
मस्क यांनी 'आयर्न मॅन २' या चित्रपटात स्वतःचीच भूमिका साकारली आहे. यातील टोनी स्टार्क (आयर्न मॅन) हे कॅरेक्टर मस्क यांच्या जीवनावरून प्रेरित आहे. द सिम्पसन, बिग बँग थेरी, साऊथ पार्क यातही मस्क यांनी काम केले आहे.