Elon Musk New Tweet Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk New Tweet: ट्विटर खरेदीबाबत आधीच केली होती भविष्यवाणी; एलन मस्क यांचे ट्विट पुन्हा चर्चेत

एलन मस्कने 15 वर्षापुर्वीचा एक फोटो शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी गेल्या महिन्यात ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतले. मस्कने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांचा असा विश्वास आहे की 2015 मध्येच 'सिम्पसन्स' नावाच्या अमेरिकन कार्टूनने ट्विटरच्या खरेदीचा अंदाज लावला होता. मस्कने हा फोटो ट्विट केला आहे. 

अलीकडील ट्विटमध्ये, ट्विटरचे नवीन 'बॉस' एलन मस्क यांनी 2015 मध्ये द सिम्पसनने त्याच्या ट्विटर अधिग्रहणाची भविष्यवाणी कशी केली याचा खुलासा केला आहे. एलन मस्कने 2015 च्या अॅनिमेटेड सिटकॉम एपिसोडमधील एक फोटो (Photo) शेअर केला आहे. जो त्याच्या ट्विटरच्या खरेदीबद्दल दिसत आहे. त्याने लिहिले, "सिम्पसनने भाकीत केले की मी Twitter S26E12 विकत घेईन."

दरम्यान, एलन मस्क (Elon Musk) यांच्या चाहत्यांनी त्यांचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याची उंची 5 फूट 9 इंच आहे. तसेच रॉकेटवर बसलेल्या बकरीच्या शरीरावर मस्क यांचा हुबेहुब चेहरा तयार करुन लावण्यात आला आहे. हा पुतळा बनवण्यासाठी 4.8 कोटी रुपये खर्चं आला आहे. या पुतळ्याला या चाहत्यांनी "Elon GOAT Token' असे नाव दिले आहे.

  • एलन मस्क नेहमीच चर्चेत

मस्क नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच व्हायरल होतात. अलिकडेच मस्क यांनी ट्विटर (Twitter) कंपनी विकत घेतल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांमुळे मस्क प्रचंड चर्चेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

Goa Politics: निवडणुकीपूर्वी भाजपची 'युवा' भरती! पर्वरीत 100 तरुणांचा जाहीर प्रवेश; पर्यटनमंत्री खंवटेंनी फुंकले विजयाचे रणशिंग

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT