Starlink Satellite Internet service Dainik Gomantak
ग्लोबल

Watch Video: एलन मस्क यांच्या SpaceX चं अमेरिकन सैन्यासाठी गुप्तचर मिशन, वाचा सविस्तर

SpaceX Launched Secret Satellite: एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीकडून कंटीन्यूअस ब्रॉडकास्ट ऑगमेंटिंग SATCOM 2 USSF-67 (CBAS-2) सॅटेलाइट लाँच करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

SpaceX Launched Secret Satellite: एलन मस्क  यांच्या मालकीची अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्स (SpaceX) कडून एक नवीन गुप्तचर मोहीम राबवण्यात आली आहे. स्पेसएक्सने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या (NASA) कॅनडी स्पेस सेंटरवरून एक हेव्ही फॉल्कन रॉकेट लाँच केले आहे.

स्पेसएक्स कंपनीकडून कंटीन्यूअस ब्रॉडकास्ट ऑगमेंटिंग SATCOM 2 USSF-67 (CBAS-2 Mission) सॅटेलाइट लाँच करण्यात आले आहे. हे सॅटेलाईट अमेरिकन स्पेसपोर्ससाठीचं क्लासिफाईड (USSF-67) गुप्तचर मिशन आहे.

निवडक जण वगळता स्पेसएक्स आणि अमेरिकन सरकारला या गुप्तचर मोहिमेबाबत अधिकची माहिती देण्यात आलेली नाही.

स्पेसएक्सकडून SATCOM 2 (CBAS-2) हे सॅटेलाईट पृथ्वीपासून 35 हजार किलोमीटर अंतरावर पाठवण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंटीन्यूअस ब्रॉडकास्ट ऑगमेंटिंग SATCOM 2 (CBAS-2) हे सॅटेलाईट पृथ्वीबाहेरील कक्षेत यशस्वीरित्या पाठवण्यात आले आहे.

हे सॅटेलाईट अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेसाठी फार महत्त्वाचे आहे. SATCOM 2 हा सैन्य दलांना अधिक माहिती देऊन त्यांचा संपर्क वाढवण्यात आणि शत्रूशी दोन हात करण्यासाठी आवश्यक माहिती सेन्य दलाला पोहोचवेल. 

स्पेस फोर्सच्या अधिकार्‍यांनी Space.com ला दिलेल्या माहितीनुसार, CBAS-2 या मिशनचा उद्देश विद्यमान लष्करी उपग्रहांची संपर्क क्षमता वाढवणे आणि सॅटेलाईटद्वारे सतत नवीन सैन्य डेटा उपल्बध करणे हे आहे. फाल्कन हेवी रॉकेट हे SpaceX चे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. आतापर्यंत या रॉकेटने 5 प्रक्षेपण आणि 11 लँडिंग केले आहे.

  • फॉल्कन हेवी रॉकेटची वैशिष्ट्ये

फाल्कन हेवी रॉकेट सुमारे 64 मेट्रिक टन कक्षेत पोहोचू शकतो. USSF-67 या सॅटेलाईटचे वजन 18,747 विमानांच्या वजनाएवढे आहे. नुकताच SpaceX ने एक व्हिडीओ शेअर करत नुकत्याच लाँच झालेल्या मिशनची माहिती दिली आहे. फाल्कन 9 रॉकेटच्या पहिल्या स्टेजवर कॅमेरा बसवण्यात आला आहे. या लाँचचा संपूर्ण व्हिडीओ स्पेसएक्सने शेअर केला आहे.

  • 7,500 सॅटेलाईट्स प्रक्षेपणाची परवानगी

याशिवाय SpaceX ने नुकतेच 54 नेक्स्ट जनरेशन स्टारलिंक इंटरनेट सॅटेलाइट्स देखील लाँच केले आहेत. स्पेसएक्सचे हे उपग्रह फार महत्त्वाचे आहेत. हे सॅटेलाईट्स पहिल्या पिढीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत.

हे सॅटेलाईट्स जास्त प्रमाणात इंटरनेट ट्रॅफिक नियंत्रित करू शकतात. यामुळे लोकांच्या थेट त्यांच्या स्मार्टफोनवर सॅटेलाइट इंटरनेट सेवा पोहोचवू शकते. या उपग्रहांना 'जनरल 2' असेही म्हटले जात आहे. SpaceX ला असे 7,500 सॅटेलाईट्स लाँच करण्यासाठी अमेरिकन सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. यापूर्वीही 54 उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटच्या मदतीने अवकाशात सोडण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT