Elon Musk  Dainik Gomantak
ग्लोबल

एलन मस्क यांना 'मून मिशन' साठी कॉन्ट्रॅक्ट देणं योग्यच: US सरकार

नासाने चुकीच्या पध्दतीने 'एस्ट्रोनॉट लूनर लॅंडर’' (Astronaut Lunar Lander) चे कॉन्ट्रक्ट एलन मस्क (Elon Musk) यांच्या स्पेसएक्सला दिले.

दैनिक गोमन्तक

अमेरिकी सरकारच्या (US Government) आकाउंटबिलिटी कार्यालयाने शुक्रवारी एका मोठ्या विधानाचं खंडन करत म्हटले, नासाने चुकीच्या पध्दतीने 'एस्ट्रोनॉट लूनर लॅंडर’' (Astronaut Lunar Lander) चे कॉन्ट्रक्ट एलन मस्क (Elon Musk) यांच्या स्पेसएक्सला दिले. दरम्यान अमेझॉन कंपनीचे सर्वेसर्वा जेफ बेजोस (Jeff Bezos) यांनी सपेसएक्सला एस्ट्रोनॉट लूनरचे कॉन्ट्रक्ट देण्यासंबंधी विरोध केला होता. बायडन प्रशासनाकडे यासंबंधी जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन आणि लीडोस यांच्या डायनेटीक्स कंपनीने तक्रारही दाखल केली होती.

अकाऊंटेबिलिटी ऑफिसच्या व्यवस्थापकीय सहाय्यक जनरल काउंसलर केनेथ पॅटन ने एका उत्तरामध्ये म्हटले होते की, नासा ने खरेदी कायद्यासंबंधी विनियमनाचे उल्लंघन केलेले नाही. नासाने कॉन्ट्रॅक्ट देत आखून दिलेल्या नियम मोडले नाहीत. तिन्ही प्रस्तावांचे मूल्याकंन उचित असून खरेदी कायदा, विनियमन आणि घोषणा केलेल्या अटीनुसार होते. अकाउंटेबिलिटी ऑफिसच्या निर्णयाचे अमेरिकी स्पेस एजन्सीकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे समर्थन केले होते. नासाने एप्रिल महिन्यामध्ये आश्चर्यजनक घोषणा करत म्हटले होते की. आम्ही स्पेसएक्स कंपनीला 2.9 बिलियन डॉलरचे कॉन्ट्रक्ट देणार आहे. आणि या घोषणेनंतर वादाला ठिणगी पडली.

का महत्तवाचं आहे कॉन्ट्रॅक्ट

स्पेसएक्सबरोबर 'एस्ट्रोनोट लूनर लॅंडर' चे कॉन्ट्रॅक्ट मिळविण्याच्या शर्यतीत ब्लू ओरिजीन आणि डायनेटिक्स कंपन्या होत्या. असं म्हटलं जात होत की, नासा दोन कॉन्ट्रॅक्ट जाहीर करणार. मात्र अमेरिकी कॉंग्रेसने या प्रोग्रमसाठी खूपच कमी निधी दिला. आणि या कारणामुळेच नासाने एकच कॉन्ट्रॅक्ट जारी केले. ब्लू ओरिजिनचे प्रवक्त्यांनी माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मानतो की, नासाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये काही मूलभूत मुद्दे होते. मात्र अकाउंटबिलिटी ऑफिस आपल्या सीमित अधिकारामुळे या मूलभूत मुद्यांना संबोधित करण्यात अपयशी ठरले. तर दुसरीकडे स्पेसएक्स आणि डायनेटिक्स ने या निर्णयासंबंधी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

नासाचं नेमकं म्हणण काय

नासाने एका निवेदनात म्हटले आहे की, अकाउंटबिलिटी कार्यालयाच्या निर्णयामुळे एजन्सीला 50 वर्षांहून अधिक काळानंतर चंद्रावर पहिल्यांदा क्रू लँडिंगसाठी समयरेखा स्थापित करण्याची परवानगी मिळेल. शक्य तितक्या लवकर, नासा आर्टेमिस, मानवी लँडिंग सिस्टीम आणि मानवाच्या चंद्रावर परत येण्याच्या मार्गाबद्दल अपडेट प्रदान करेल, असे अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने म्हटले आहे. अमेरिकेच्या व्यावसायिक भागीदारांसह अमेरिकेच्या चंद्रावर परत येण्याच्या मजबूत आणि शाश्वत दृष्टिकोनासाठी निधीची खात्री करण्यासाठी आम्ही बायडन प्रशासन आणि काँग्रेससोबत काम करणे सुरू ठेवू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT