Walmart Mass Shooting Dainik Gomantak
ग्लोबल

Walmart Mass Shooting: वर्णद्वेशाचे भूत, 21 वर्षांचा मारेकरी अन् 23 जणांची हत्या; गोष्ट, अमेरिकेतील सर्वात भयंकर हत्याकांडाची

Patrick Crusius: या प्रकरणातील बचाव पक्षाचे वकील म्हणाले, "जेव्हा या प्रकरणाचा खटला राज्य न्यायालयात सुरू होईल तेव्हा ते त्याला नक्की फाशीची शिक्षा देतील."

Ashutosh Masgaunde

Patrick Crusius has been hit with 90 life sentences for El Paso Walmart mass shooting: वॉलमार्टमध्ये 23 लोकांची कत्तल करणाऱ्या गनमन पॅट्रिक क्रूसियसला त्याच्या अधोरी गुन्ह्यांसाठी 90 जन्मठेपेंची शिक्षा झाली आहे.

पॅट्रिक क्रूसियस, एक स्वयं-घोषित गोरा राष्ट्रवादी, 2019 मध्ये अमेरिकन इतिहासात झालेल्या सर्वात प्राणघातक सामूहिक गोळीबारातील त्याच्या सहभागासाठी दोषी ठरला.

जंपसूट आणि बेड्या घातलेला 24 वर्षांचा क्रुसियस (हल्ल्यावेळी 21 वय), न्यायमूर्तींनी आपला निकाल वाचला तेव्हा निशब्द झाला, ज्यासाठी त्याला भविष्यात मृत्युदंडाची शिक्षा देखील होऊ शकते.

फेडरल वकीलांनी फाशीच्या शिक्षेची मागणी माघे घेतल्यानंतर क्रूसियसने दोषी असल्याचे मान्य केले.

टेक्सासच्या सरकारी वकिलांचे म्हणणे आहे की, जेव्हा या प्रकरणाचा खटला राज्य न्यायालयात सुरू होईल तेव्हा ते त्याला नक्की फाशीची शिक्षा देतील.

वॉलमार्टमध्ये गोळीबार करताना 21 वर्षांचा पॅट्रिक क्रूसियस.
गुन्हेगाराने मुलांना त्यांच्या पालकांपासून तोडले, जोडीदारांना त्यांच्या जोडीदारांपासून तोडले, पण आम्हाला अजूनही त्यांची गरज होती.
बर्था बेनाविड्स, हल्ल्यात मारले गेलेल्या आर्टुरा यांची पत्नी

The Inconvenient Truth नावाच्या 2,300 शब्दांच्या मनोगतात, क्रुसियस म्हणाला की वर्णद्वेष आणि टेक्सासवरील तथाकथित हिस्पॅनिक आक्रमणाच्या दाव्यांमुळे प्राणघातक हल्ला करण्याच्या त्याच्या निर्णयाला बळ मिळाले.

3 ऑगस्ट, 2019 रोजी, एलेन, टेक्सास येथील क्रूसियसने डॅलस उपनगरापासून एल पासोपर्यंत 700 मैलांचे अंतरात बंदुकीच्या असंख्य गोळ्या चालवल्या. त्यानंतर, त्याने "हा हल्ला टेक्सासवरील हिस्पॅनिक आक्रमणाला प्रतिसाद आहे," असे मजकूर सोशल मीडियावर अपलोड केला. असे कोर्टाच्या नोंदीत उघड झाले आहे.

"मी फक्त माझ्या देशाचा सांस्कृतिक आणि जातीय बदली आक्रमणापासून रक्षण करत आहे," असे शब्दही त्यामध्ये होतो.

"पॅट्रिकची विचारसरणी वास्तवाशी विसंगत आहे... परिणामी त्याचे रुपांतर भ्रामक विचारसरणीमध्ये झाले होते," असे बचाव पक्षाचे वकील जो स्पेन्सर म्हणाले.

पॅट्रिक क्रूसियसने केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेले.
जगाला हिस्पॅनिक लोकांपासून मुक्त करेन असे वचन देणाऱ्या, मारेकऱ्याच्या 2,300 शब्दांच्या दयनीय आणि क्षमस्व मनोगताचा निषेध आहे. पण मारेकरी हिस्पॅनिक लोकांचे काहीही करू शकला नाही. तो अपयशी ठरला. आम्ही अजूनही इथेच आहोत आणि आम्ही कुठेही जाणार नाही. गेल्या चार वर्षांपासून मारेकरी हिस्पॅनिक लोकांनी भरलेल्या शहरात अडकला आहे.
अमरिस वेगा
टेक्सासच्या एल पासो येथील फेडरल कोर्टाबाहेर मीडियाशी बोलताना अमरिस वेगा. वॉलमार्ट सामूहिक गोळीबारात त्यांची मावशी तेरेसा सांचेझ मृत्यूमुखी पडल्या. तर आई आणि आजी जखमी झाल्या होत्या.

सुनावनीच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी, मारेकरी भावनाविहीन आणि शांत बसला, परंतु दुसऱ्या दिवशी तो भावूक झाल्याचे दिसले आणि त्याने आपल्या बचाव पक्षाच्या वकिलाला सांगितले की तो पीडितांना उत्तर देऊ शकत नाही. .

मारेकरी क्रुसियस US-Mexico सीमावादाला कंटाळला होता आणि त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या #BuildtheWall चळवळीची सतत प्रशंसा आणि पाठींबा देण्यासाठी ट्विटही करत होता.

स्थलांतरित हक्क कार्यकर्त्यांनी वर्णद्वेषाची मानसिकता आणि विभाजनाचे उदाहरण म्हणून या सामूहिक गोळीबाराचे वर्णन केले आहे.

एल पासोमधील हिस्पॅनिक समुदाय आता कुठेतरी गुन्ह्येगारीतून बाहेर येत असताना, क्रूसियसच्या गोळीबाराने त्यांना पुन्हा गुन्हेगारी विश्वात ढकलण्याचे काम केले आहे, असे बाचव पक्षाचे वकील म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT