Italy Dainik Gomantak
ग्लोबल

Italy Floods: इटलीत मुसळधार पावसामुळे विध्वंस; 8 जणांचा मृत्यू; हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

इटलीत मुसळधार पावसामुळे मोठे निकसान झाले आहे.

Puja Bonkile

Heavy Rains Flood Italy: इटलीत मुसळधार पावसामुळे मोठा विध्वंस झाला आहे. आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर एमिलिया रोमाग्ना भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.

शहरात सर्वत्र पाणी शिरले आहे. रस्ते जलमय झाले आहेत. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. आतापर्यंत हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे.

या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 8 ते 9 लोकांनी आपला जीव गमावला आहे. एएफपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर रॉयटर्सने 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

इटलीच्या उत्तर एमिलिया रोमाग्ना भागात मुसळधार पावसामुळे जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले, असे ट्विट एएनआयने एएफपी न्यूजच्या हवाल्याने दिले आहे.

तर रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार इटलीच्या उत्तर एमिलिया-रोमाग्ना प्रदेशात मुसळधार पावसाने पूर आणि भूस्खलन होत असल्याने आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना त्यांच्या घरातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.

तसेच, नद्यांना पुर आला आहे. यामुळे शहरांमध्ये पाणी शिरले आहे. हजारो अकर शेतजमीन पाण्याखाली गेल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT