earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake in Nepal: नेपाळ पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, जाणवले 6.0 तीव्रतचे धक्के

नेपाळमधील काठमांडूमध्ये रविवारी सकाळी 7.58 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

दैनिक गोमन्तक

नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.0 इतकी मोजण्यात आली. आज सकाळी हा भूकंप झाला. काठमांडूपासून 147 किमी अंतरावर भूकंप झाला. नेपाळच्या वेळेनुसार सकाळी 8.13 वाजता भूकंप झाला. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटर (NEMRC) नुसार, खोटांग जिल्ह्यातील मार्तिम बिर्ता नावाच्या ठिकाणी भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व नेपाळच्या 10 किलोमीटरच्या त्रिज्येत मोजण्यात आला.

नेपाळमध्ये झालेल्या या भूकंपामुळे सध्यातरी कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. अलीकडील काही भूकंपांमुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. 25 एप्रिल 2015 रोजी नेपाळची राजधानी काठमांडू आणि पोखरा शहरादरम्यान 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे कहर झाला होता. या भूकंपामुळे 8,964 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 22 हजार लोक जखमी झाले. नेपाळमधील या विनाशकारी भूकंपाला गोरखा भूकंप असेही म्हणतात. उत्तर भारतातील अनेक शहरांसह पाकिस्तान आणि बांगलादेशातील काही भाग हादरले. भूकंपामुळे काठमांडूचे आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करावे लागले. भूकंपामुळे माउंट एव्हरेस्टवर बर्फाचे वादळ आले, ज्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला.

* भूकंप झाल्यास काय करावे?
भूकंपानंतर तुम्ही घरी असाल तर जमिनीवर बसण्याचा प्रयत्न करा.
किंवा तुमच्या घरात टेबल किंवा फर्निचर असेल तर त्याखाली बसा आणि हाताने डोके झाकून घ्यावे.
भूकंपाच्या वेळी घरातच रहा आणि हादरे थांबल्यानंतरच बाहेर पडा.
भूकंपाच्या वेळी, घरातील सर्व पॉवर स्विच बंद करा.

* भूकंप झाल्यास काय करू नये?

भूकंपाच्या वेळी लिफ्ट वापरणे टाळा.
भूकंपाच्या वेळी तुम्ही घरात असाल तर दरवाजे, खिडक्या आणि भिंतींपासून दूर राहा.
भूकंपाच्या वेळी तुम्ही घरी असाल तर घराबाहेर पडू नका.आपण जिथे आहात तिथे स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करा.
भूकंपाच्या वेळी तुम्ही घराबाहेर असाल तर उंच इमारती आणि विजेच्या खांबांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT